जगातील सर्वात ओव्हररेटेड क्रिकेटपटू कोण? शोएब अख्तरने सांगितलेलं नाव ऐकून धक्काच बसेल!-shoaib akhtar told that england wicket keeper batter jonny bairstow most overrated player in cricket world now ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  जगातील सर्वात ओव्हररेटेड क्रिकेटपटू कोण? शोएब अख्तरने सांगितलेलं नाव ऐकून धक्काच बसेल!

जगातील सर्वात ओव्हररेटेड क्रिकेटपटू कोण? शोएब अख्तरने सांगितलेलं नाव ऐकून धक्काच बसेल!

Aug 23, 2024 05:40 PM IST

शोएब अख्तरने ओव्हररेट क्रिकेटपटूचे नाव उघड केले आहे. अख्तर म्हणाला की, इंग्लंडचा जॉनी बेअरस्टो ओव्हररेटेड क्रिकेटपटू आहे. त्याने इंग्लिश खेळाडूचे वर्णन सध्याच्या क्रिकेट विश्वातील सर्वात ओव्हररेटेड खेळाडू असे केले.

Shoaib Akhtar : जगातील सर्वात ओव्हररेटेड क्रिकेटपटू कोण? शोएब अख्तरने सांगितलेलं नाव ऐकून धक्काच बसेल!
Shoaib Akhtar : जगातील सर्वात ओव्हररेटेड क्रिकेटपटू कोण? शोएब अख्तरने सांगितलेलं नाव ऐकून धक्काच बसेल!

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने सध्या क्रिकेट जगतातील सर्वात 'ओव्हररेटेड' खेळाडूचे नाव सांगितले आहे. शोएबने अतिशय धक्कादायक नाव घेतले आहे. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज अनेकदा त्याच्या वक्तव्यांमुळे चर्चेत राहतो. यावेळीही अख्तरची अशीच एक गोष्ट चर्चेत आली आहे.

'स्पोर्ट्सकीडा'शी बोलताना शोएब अख्तरने ओव्हररेट क्रिकेटपटूचे नाव उघड केले आहे. अख्तर म्हणाला की, इंग्लंडचा जॉनी बेअरस्टो ओव्हररेटेड क्रिकेटपटू आहे. त्याने इंग्लिश खेळाडूचे वर्णन सध्याच्या क्रिकेट विश्वातील सर्वात ओव्हररेटेड खेळाडू असे केले.

बेअरस्टो इंग्लंडच्या प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे. तो इंग्लिश संघासाठी तिन्ही फॉरमॅट खेळणारा खेळाडू आहे. कारकिर्दीत १०० कसोटी सामने खेळणाऱ्या फलंदाजांच्या यादीत बेअरस्टोचा समावेश आहे. याशिवाय त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्येही १०० सामन्यांचा टप्पाही पार केला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट व्यतिरिक्त, बेअरस्टो जगभरातील विविध T20 लीगमध्ये देखील खेळतो. इंग्लिश यष्टिरक्षक फलंदाजाचे सर्वत्र चांगले रेकॉर्ड आहे. अशा स्थितीत त्याला ओव्हररेटेड खेळाडू म्हणणे योग्य वाटत नाही. तथापि, अख्तरने बेअरस्टला ओव्हररेटेड का म्हटले हे उघड केले नाही.

बेअरस्टोची आतापर्यंत आंतरराष्ट्रीय कारकीर्द 

जॉनी बेअरस्टोने २०११ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आतापर्यंत त्याने १०० कसोटी, १०७ एकदिवसीय आणि ८० टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. 

कसोटीच्या १७८ डावांमध्ये त्याने ३६.३९ च्या सरासरीने ६०४२ धावा केल्या आहेत. यात त्याने १२ शतके आणि २६ अर्धशतके केली आहेत. 

याशिवाय, एकदिवसीय सामन्यांच्या ९८ डावांमध्ये इंग्लिश फलंदाजाने ४२.९७ च्या सरासरीने ३८६८ धावा केल्या आहेत आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या ७२ डावांमध्ये २९.८३ आणि १३७.५३ च्या स्ट्राइक रेटने १६७१ धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने ११ शतके आणि १७ अर्धशतके केली आहेत, तर टी-20 मध्ये त्याने ११ अर्धशतके केली आहेत.