IND vs PAK : खुदा का वास्ता आज… भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी शोएब अख्तरने पाकिस्तानला दिला गुरुमंत्र
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs PAK : खुदा का वास्ता आज… भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी शोएब अख्तरने पाकिस्तानला दिला गुरुमंत्र

IND vs PAK : खुदा का वास्ता आज… भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी शोएब अख्तरने पाकिस्तानला दिला गुरुमंत्र

Updated Jun 09, 2024 07:48 PM IST

Shoaib Akhtar Message To Pakistan Team : पाकिस्तानला अमेरिकेविरुद्ध लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्याचवेळी आज बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघ आज भारताविरुद्ध मैदानात उतरणार आहे.

IND vs PAK : खुदा का वास्ता आज… भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी शोएब अख्तरने पाकिस्तानला दिला गुरुमंत्र
IND vs PAK : खुदा का वास्ता आज… भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी शोएब अख्तरने पाकिस्तानला दिला गुरुमंत्र

Shoaib Akhtar Message To Pakistan Cricket Team : टी-20 वर्ल्डकप २०२४ चा सर्वात मोठा सामना आज (९ जून) भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जाणार आहे. दोन्ही संघ न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर आमनेसामने येतील. या सामन्यासाठी भारत आणि पाकिस्तानचे संघ सज्ज झाले आहेत. भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सामना सुरू होईल.

वास्तविक, याआधी पाकिस्तानला अमेरिकेविरुद्ध लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्याचवेळी भारतीय संघाने आयर्लंडला हरवून आपल्या मोहिमेला सुरुवात केली. अशा स्थितीत बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघ भारताला टक्कर देऊ शकेल का? अशी चर्चा सुरू आहे.

मात्र, आता भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने आपल्या पाकिस्तानी संघाला प्रोत्साहन दिले आहे.

भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी शोएब अख्तर म्हणाला की, अमेरिकेकडून पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानला पुनरागमन करण्यासाठी आपल्या ताकदीनुसार खेळावे लागेल.

'खुदा का वास्ता आज देशासाठी खेळा'

शोएब अख्तरने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शोएब अख्तर म्हणत आहे, हॅलो मित्रांनो, मी शोएब अख्तर आहे आणि मी सामन्याचे विश्लेषण करण्यासाठी स्टेडियममध्ये जात आहे, मित्रांनो, पाकिस्तानसाठी प्रार्थना करा, अल्लाहसाठी, आज स्वतःसाठी नाही तर मनापासून देशासाठी खेळा. वैयक्तिक आकेडवारी कोणीच लक्षात ठेवत नाही. पण संघाची कामगिरी सगळेजण लक्षात ठेवतात. जावेद भाईचा षटकार आठवा, माझी कोलकात्यातील गोलंदाजी आठवा, चॅम्पियन्स ट्रॉफी आठवा, २००९ चा वर्ल्ड कप आठवा.'

देशासाठी खेळा

शोएब अख्तर पुढे म्हणतोय की, तुम्ही पाकिस्तानसाठी मॅच जिंकल्याचे लोक लक्षात ठेवतील. वैयक्तिक कामगिरी लोक लगेच विसरतात. आज एकमेकांसाठी खेळा, पाकिस्तानसाठी खेळा, पाकिस्तानच्या मनोबलासाठी खेळा, संपूर्ण पाकिस्तान तुमच्याकडे पाहत आहे.

तसेच या व्हिडिओमध्ये शोएब अख्तर म्हणाला की, पाकिस्तानचे मनोबल वाढवा, पाकिस्तानची मान जिंकून उंच करा आणि ज्या चिखलात तुम्ही अडकला आहात, त्या चिखलातून तुम्हाला बाहेर यावे लागेल. लढा आणि खेळा, मी तुमच्यासोबत आहे."

Whats_app_banner

संबंधित बातम्या