Shoaib Akhtar : या अभिनेत्रीवर जडला होता शोएब अख्तरचा जीव; पाकिटात ठेवायचा फोटो, पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Shoaib Akhtar : या अभिनेत्रीवर जडला होता शोएब अख्तरचा जीव; पाकिटात ठेवायचा फोटो, पाहा

Shoaib Akhtar : या अभिनेत्रीवर जडला होता शोएब अख्तरचा जीव; पाकिटात ठेवायचा फोटो, पाहा

Mar 02, 2024 03:49 PM IST

Shoaib Akhtar Sonali Bendre : रावळपिंडी एक्सप्रेस शोएब अख्तर सध्या चर्चेत आहे. कारण त्याची पत्नी रुबाब खानने एका मुलीला जन्म दिला आहे. शोएब आणि रुबाब तिसऱ्यांदा माता-पिता बनले आहेत.

Shoaib Akhtar Sonali Bendre
Shoaib Akhtar Sonali Bendre

Shoaib Akhtar Sonali Bendre Story : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर आणि त्याची पत्नी रुबाब खान यांनी गुडन्यूज दिली आहे. शोएब आणि रूबाब हे तिसऱ्यांदा आई-वडील बनले आहेत. रुबाब खानने शुक्रवारी (१ मार्च) एका मुलीला जन्म दिला. 

याआधी शोएब आणि रुबाब खान यांना मोहम्मद मिकाइल अली आणि मोहम्मद मुजद्दीद अली अशी दोन मुले आहेत. दोघांनी २०१४ मध्ये लग्न केले होते आणि त्यांना २०१६ मध्ये पहिले आणि २०१९ मध्ये दुसरे अपत्य झाले.

रावळपिंडी एक्सप्रेस शोएब अख्तरने आपल्या नवजात मुलीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. शोएबने आपल्या नवजात मुलीचे नाव नूरेह अली अख्तर असे ठेवले आहे. 

दरम्यान, आपण येथे शोएब अख्तरच्या एका जुन्या स्टोरीबाबत जाणून घेणार आहोत. ही स्टोरी त्यानेच सांगितली होती. वास्तविक, शोएब अख्तर एकेकाळी बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या प्रेमात वेडा होता. 

सोनालीला पाहताच शोएब तिच्या प्रेमात पडला होता. शोएबने सोनाली बेंद्रेला किडनॅप करायचा प्लॅनही बनवला होता.

शोएबने सोनाली बेंद्रेबाबत काय सांगितलं होतं?

एका मुलाखतीत शोएब अख्तरने सांगितले होते की, त्याच्या भारत दौऱ्यात त्याने बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेला पहिल्यांदा पाहिले. तिला पाहताच तो तिच्या प्रेमात पडला. तसेच, सोनालीने जर आपले प्रपोजल स्वीकारले नाही, तर आपण तिला किडनॅप करायचा प्लॅनही बनवला होता, असे शोएबने सांगितले'.

शोएबने मुलाखतीत कबूल केले होते,की सोनाली त्याची क्रश होती आणि त्याला तिच्याशी लग्न करायचे होते. सोनालीसाठी तो काहीही करायला तयार होता, आणि तिचा होकार मिळवण्यासाठी तो तिला कॅडनॅप करायलाही तयार होता, शोएबने विनोदी स्वरात या भावना व्यक्त केल्या होत्या.

शोएब सोनाली बेंद्रेला लाइक करायचा हे त्याच्यासंघातील इतर खेळाडूंनाही माहीत होते. शोएब त्याच्या पाकिटात सोनालीचा फोटोदेखील ठेवायचा. 

शोएब अख्तरचं आंतरराष्ट्रीय करिअर

शोएब अख्तरने पाकिस्तानसाठी ४६ कसोटी, १६३ एकदिवसीय आणि १५ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. शोएबच्या नावावर कसोटीत १७८, एकदिवसीय सामन्यात २४७ आणि आंतरराष्ट्रीय T20 मध्ये १९ विकेट आहेत. शोएबने आयपीएलमध्येही ३ सामने खेळले आहेत. 

आयपीएलमध्ये त्याच्या नावावर ५ विकेट आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम आजही शोएबच्या नावावर आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या