Shoaib Akhtar Crush On Bollywood Actress : क्रिकेट आणि बॉलीवूडचे नाते खूप जुने आहे. केवळ भारतीय क्रिकेटर्सच नाही तर अनेक परदेशी क्रिकेटपटूंनीही बॉलिवूड अभिनेत्रींशी लग्न केले आहे. पाकिस्तानी क्रिकेटपटूंनाही अनेकदा बॉलिवूड अभिनेत्रींवर क्रश असतो.
अशातच आता, माजी पाकिस्तानी फास्ट बॉलर शोएब अख्तर याचा कोणत्या बॉलिवूड अभिनेत्रीवर क्रश होता. हे त्यानेच सांगितले आहे. ती अभिनेत्री शोएबला इतकी आवडायची की त्याने तिचे 'अपहरण' करायचा प्लॅन आखला होता.
शोएब अख्तरने नुकतेच एका मुलाखतीत बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिच्यावर क्रश असल्याचा खुलासा केला आहे. अख्तरने सांगितले की, त्याला सोनाली बेंद्रे खूप आवडते. सोनाली बेंद्रेबद्दल बोलताना अख्तरने गंमतीने असेही म्हटले की, जर तिने आपले प्रपोजल स्वीकारले नसते तर आपण तिला 'किडनॅप' केले असते.
शोएब अख्तर सोनालीचा फोटो पर्समध्ये ठेवायचा. ताच्यासोबत खेळणाऱ्या इतर खेळाडूंनाही याची माहिती होती, असा दावाही विविध मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. मात्र, अख्तरची ही एकतर्फी प्रेमकहाणी कधीच पुढे जाऊ शकली नाही.
सोनाली बेंद्रेने एका मुलाखतीत शोएब अख्तरच्या या एकतर्फी प्रेमावर प्रतिक्रिया देताना म्हटले होते, "मला माहित नाही की हे किती खरे आहे. पण त्यावेळीही फेक न्यूज होत्या."
विशेष म्हणजे शोएब अख्तर हा पाकिस्तानसाठी तिन्ही फॉरमॅट खेळणारा गोलंदाज होता. त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ४६ कसोटी, १६३ एकदिवसीय आणि १५ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले.
कसोटी सामन्याच्या ८२ डावांमध्ये त्याने २५.६९ च्या सरासरीने १७८ विकेट घेतल्या.
याशिवाय, एकदिवसीय सामन्यांच्या १६२ डावांमध्ये, अख्तरने २४.९७ च्या सरासरीने २४७ विकेट घेतल्या, तर T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या १५ डावांमध्ये त्याने १९ विकेट घेतल्या.
संबंधित बातम्या