भारत जिथे म्हणेल, तिथे जा आणि त्यांना मारून या, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वादात शोएब अख्तरचं वादग्रस्त विधान
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  भारत जिथे म्हणेल, तिथे जा आणि त्यांना मारून या, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वादात शोएब अख्तरचं वादग्रस्त विधान

भारत जिथे म्हणेल, तिथे जा आणि त्यांना मारून या, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वादात शोएब अख्तरचं वादग्रस्त विधान

Dec 02, 2024 08:27 PM IST

Shoaib Akhtar on ICC Champions Trophy 2025 : पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने वादग्रस्त विधान केले आहे. पाकिस्तान २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करत आहे. ही स्पर्धा पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये खेळवली जाणार आहे. मात्र, सुरक्षेचे कारण देत भारताने आपला संघ पाकिस्तानला पाठवण्यास नकार दिला.

भारत जिथे म्हणेल, तिथे जा आणि त्यांना मारून या, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वादात शोएब अख्तरचं वादग्रस्त विधान
भारत जिथे म्हणेल, तिथे जा आणि त्यांना मारून या, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वादात शोएब अख्तरचं वादग्रस्त विधान

चॅम्पियन्स ट्रॉफीचा २०२५ च्या वाद संपताना दिसत नाहीये. अनेक दिवसांनी नकार दिल्यानंतर अखेर ही जागतिक स्पर्धा हायब्रीड मॉडेलमध्ये आयोजित करण्यास पीसीबीने होकार दिला आहे.

पण यादरम्यानच, आता शोएब अख्तर याने एका पाकिस्तानी वाहिनीवर वादग्रस्त विधान केले आहे. वास्तविक, २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत भारत आणि आयसीसीच्या वृत्तीवर शोएब अख्तर खूश नाही.

पाकिस्तान २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करत आहे. ही जागतिक स्पर्धा पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये खेळवली जाणार आहे. मात्र, सुरक्षेचे कारण देत भारताने आपला संघ पाकिस्तानला पाठवण्यास नकार दिला होता.

अशा परिस्थितीत आता ही स्पर्धा हायब्रीड पद्धतीने खेळवली जाणार आहे. यामध्ये भारतीय संघ दुबईत आपले सामने खेळणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामनाही दुबईत होणार आहे. मात्र, पीसीबीने काही अटींसह हायब्रीड मॉडेलवर तयारी केली आहे.

पीसीबीने आयसीसीला सांगितले की, जेव्हाही आयसीसीचा कोणताही कार्यक्रम भारतात आयोजित केला जाईल तेव्हा ते तिथे आपला संघ पाठवणार नाही. अशा परिस्थितीत आयसीसीला ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलमध्ये आयोजित करावी लागेल. मात्र, याबाबत शोएब अख्तरची भूमिका पूर्णपणे वेगळी आहे.

शोएब अख्तर म्हणाला, की "तुम्हाला होस्टिंग राइट्स आणि कमाईसाठी पैसे दिले जात आहेत. हे ठीक आहे. आम्ही समजतो. पाकिस्तानची भूमिकाही त्याच्या जागी अगदी योग्य होती. जेव्हा आपण आपल्या देशात चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजित करण्यास सक्षम आहोत, तेव्हा ते यायला नकार देत आहेत. आयसीसीने जास्त महसूल आमच्यासोबत शेअर केला पाहिजे. हा एक चांगला कॉल आहे."

भविष्यात कोणत्याही स्पर्धेसाठी पाकिस्तानचा संघ भारतात जाण्याबाबत शोएब अख्तर म्हणाला, “जोपर्यंत भारतात खेळण्याचा प्रश्न आहे, तेव्हा आपण मैत्रीचा हात पुढे केला पाहिजे. आपल्या संघाने तिथे जायला हवे. पाकिस्तानने भारतात जावे, यावर माझा नेहमीच विश्वास आहे. आणि तेथे जाऊन विजय मिळवावा. ते जिथे म्हणतील तिथे जा आणि त्यांना हरवा.”

Whats_app_banner