Shivam Dube : शिवम दुबे तुफान फॉर्मात, टी-20 विश्वचषकात हार्दिक पांड्याची जागा घेणार? जाणून घ्या-shivam dube vs hardik pandya dube socred second fifty becomes competitor of hardik pandya for t20 world cup 2024 ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Shivam Dube : शिवम दुबे तुफान फॉर्मात, टी-20 विश्वचषकात हार्दिक पांड्याची जागा घेणार? जाणून घ्या

Shivam Dube : शिवम दुबे तुफान फॉर्मात, टी-20 विश्वचषकात हार्दिक पांड्याची जागा घेणार? जाणून घ्या

Jan 15, 2024 11:47 AM IST

IND vs AFG Shivam Dube : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळली जात आहे. टी -20 वर्ल्डकपच्या दृष्टीने ही मालिका अत्यंत महत्वाची आहे. या मालिकेतील सुरुवातीचे दोन सामने भारताने जिंकले आहेत.

Shivam Dube
Shivam Dube (PTI)

 Shivam Dube Hardik Pandya : टीम इंडियाचा ऑलराऊंडर शिवम दुबे सध्या तुफान  फॉर्मात आहे. त्याने अफगाणिस्तानविरुद्ध सलग दुसऱ्या टी-20 सामन्यात अर्धशतक झळकावले आहे. यानंतर आता शिवम दुबेचा टी-20 वर्ल्डकपच्या संघात समावेश करावा, अशी मागणी क्रिकेट चाहते करताना दिसत आहेत.

सध्या भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळली जात आहे. टी -20 वर्ल्डकपच्या दृष्टीने ही मालिका अत्यंत महत्वाची आहे. या मालिकेतील सुरुवातीचे दोन सामने भारताने जिंकले आहेत. या दोन्ही सामन्यात शिवम दुबेने अर्धशतकं केली आहेत. आता मालिकेतील तिसरा आणि शेवटचा टी-20 १७ जानेवारी रोजी खेळला जाणार आहे.

विशेष म्हणजे, शिवम दुबे बऱ्याच काळापासून टीम इंडियातून बाहेर होता. पण आता टी-20 वर्ल्ड कपच्या काही महिन्यांपूर्वी शिवम दुबेचे असे पुनरागमन एखाद्या स्वप्नासारखेच आहे.

मोहालीत झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात त्याने ४० चेंडूत ६० धावांची नाबाद खेळी केली होती, तर आता इंदूरमध्ये त्याने अवघ्या ३२ चेंडूत ६३ धावा केल्या. ही त्याची आंतरराष्ट्रीय टी-20 मधील सर्वोच्च धावसंख्या आहे.

शिवम दुबे जबरदस्त फॉर्ममध्ये

शिवम दुबेने होळकर स्टेडियमच्या छोट्या बाउंड्रीचा आणि सपाट खेळपट्टीचा पुरेपूर फायदा घेतला. आपल्या अर्धशतकी खेळीत त्याने ५ चौकार आणि ४ षटकार ठोकले. यादरम्यान, त्याने यशस्वी जैस्वालसोबत तिसऱ्या विकेटसाठी ९२ धावांची भागीदारी केली.

शिवम दुबेने अवघ्या २२ चेंडूंमध्ये टी-20 करिअरचे तिसरे अर्धशतक पूर्ण केले. १०व्या षटकात मोहम्मद नबीच्या तीन चेंडूंवर तीन षटकार ठोकून शिवम दुबेने आपण कशा फॉर्ममध्ये आहोत हे दाखवून दिले.

हार्दिक पांड्याचं टेन्शन वाढलं

शिवम दुबेच्या या दमदार पुनरागमनाने टीम मॅनेजमेंट आणि कर्णधार रोहित शर्मा नक्कीच खूश असतील, पण यामुळे हार्दिक पंड्याचे टेन्शन वाढल्याचे काही क्रिकेट चाहत्यांचे आणि समिक्षकांचे मत आहे.

हार्दिक सध्या दुखापतीमुळे टीम इंडियातून बाहेर आहे. तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये सध्या फिटनेसवर मेहतन घेत आहे. तो आयपीएलपर्यंत तंदुरुस्त होण्याची अपेक्षा आहे. पण हार्दिकला शिवम दुबेच्या रुपाने एक तगडा प्रतिस्पर्धी मिळाला आहे, हे नक्की आहे.

कारण, हार्दिक पांड्या पॉवर हिटर आणि मध्यमगती गोलंदाज आहे. शिवम दुबेही मध्यमगती गोलंदाजी करतो. पहिल्या सामन्यात २  विकेट घेतल्यानंतर त्याला इंदूरच्या सामन्यातही एक विकेट मिळाला.

Whats_app_banner