India vs Zimbabwe T20 Series: टी-२० विश्वचषकानंतर भारतीय संघ झिम्बाब्वेविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. या मालिकेत वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. तर, युवा फलंदाज शुभमन गिलच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. यापूर्वी भारतीय क्रिकेट निवड समितीने संघात एक बदल केला आहे. तर, सनरायझर्स हैदराबादचा अष्टपैलू नितीश रेड्डीच्या जागी चेन्नई सुपर किंग्जचा पॉवर हिटर शिवम दुबेला द्विपक्षीय मालिकेसाठी संधी देण्यात आली.
झिम्बाब्वे दौऱ्यात भारतीय संघाने दुखापतग्रस्त रेड्डीला विश्रांती दिली. तर, त्याच्या जागी दुबेचा भारतीय संघात समावेश केला . बीसीसीआयची वैद्यकीय टीम रेड्डीयांच्या प्रगतीवर लक्ष ठेवून आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० मालिकेतील सर्व सामने हरारे स्पोर्ट्स क्बल येथे खेळले जाणार आहेत. येत्या ६ जुलैपासून भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील टी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे.
पहिला टी-२० सामना: ६ जुलै २०२४ (हरारे स्पोर्ट्स क्लब)
दुसरा टी-२० सामना: ७ जुलै २०२४ (हरारे स्पोर्ट्स क्लब)
तिसरा टी-२० सामना: १० जुलै २०२४ (हरारे स्पोर्ट्स क्लब)
चौथा टी-२० सामना: १३ जुलै २०२४ (हरारे स्पोर्ट्स क्लब)
पाचवा टी-२० सामना: १४ जुलै २०२४ (हरारे स्पोर्ट्स क्लब)
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघ : शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे, शिवम दुबे.
संबंधित बातम्या