Shikhar Dhawan : गब्बर इज बॅक! शिखर धवन क्रिकेटच्या मैदानावर परतला, प्रॅक्टिस व्हिडीओ पाहा-shikhar dhawan starts practice for ipl 2024 punjab kings shared video shikhar dhwan practice ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Shikhar Dhawan : गब्बर इज बॅक! शिखर धवन क्रिकेटच्या मैदानावर परतला, प्रॅक्टिस व्हिडीओ पाहा

Shikhar Dhawan : गब्बर इज बॅक! शिखर धवन क्रिकेटच्या मैदानावर परतला, प्रॅक्टिस व्हिडीओ पाहा

Dec 13, 2023 07:44 PM IST

Shikhar Dhawan IPL 2024 : शिखर धवनने आयपीएल २०२४ साठी सराव सुरू केला आहे. पंजाब किंग्जने धवनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

shikhar dhawan punjab kings
shikhar dhawan punjab kings

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2024) पुढच्या सीझनची ची तयारी सुरू झाली आहे. संघांसोबतच खेळाडूही सज्ज झाले आहेत. पंजाब किंग्सचा कर्णधार शिखर धवनही क्रिकेटच्या मैदानावर परतला आहे. धवनने सरावास सुरुवात केली आहे.

धवनने आयपीएल २०२४ साठी तयारी सुरू केली आहे. नुकताच तो फलंदाजीचा सराव करताना दिसला. पंजाब किंग्सने धवनचा प्रॅक्टिस करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. गेल्या मोसमात धवनने ३ अर्धशतकांच्या मदतीने ३७३ धावा केल्या होत्या.

धवनचा व्हिडीओ व्हायरल

वास्तविक, पंजाब किंग्सने X वर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये शिखर धवन फलंदाजीचा सराव करताना दिसत आहे. धवन या फलंदाजीच्या सरावादरम्यान अनेक मोठे शॉट्स खेळाना दिसत आहे. आयपीएलच्या पुढील हंगामात धवन एका नव्या स्टाईलमध्ये दिसणार आहे.

दरम्यान, गेल्या आयपीएलमध्ये धवन आणि त्याचा संघ विशेष काही करू शकला नाही. पंजाबचा संघ गुणतालिकेत ८ व्या क्रमांकावर होता. आयपीएल २०२३ मध्ये धवनने ११ सामने खेळले. यात त्याने ३७३ धावा केल्या. धवनने ३ अर्धशतके झळकावली होती.

२०२० मध्ये धवनची कामगिरी चांगली

आयपीएल २०२० धवनसाठी खूप चांगले होते. त्याने त्या सीझनमध्ये १७ सामन्यात ६१८ धावा केल्या होत्या. त्यावेळी त्याने २ शतके आणि ४ अर्धशतके झळकावली होती. धवनची सर्वोत्तम धावसंख्या म्हणजे नाबाद १०६ होती.

धवनची एकूण कामगिरी बघितली तर ती चांगली आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या २१७ आयपीएल सामन्यांमध्ये ६६१७ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ५० अर्धशतके आणि २ शतके झळकावली आहेत. धवनने ७५० चौकार आणि १४८ षटकार मारले आहेत.

IPL २०२४ साठी खेळाडूंचा लिलाव १९ डिसेंबर रोजी दुबईमध्ये होणार आहे. या मिनी लिलावात अनेक भारतीय खेळाडू सहभागी होणार आहेत.

Whats_app_banner