क्रिकेट सोडल्यानंतर शिखर धवन आता काय करणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशा स्थितीत आपण अशा तीन क्षेत्रांबद्दल जाणून घेणार आहोत, जिथे शिखर धवन आपले नशीब आजमावू शकतो.
शिखर धवनने २०१० मध्ये भारतासाठी पदार्पण केले होते आणि २०२२ मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. या काळात धवन भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी-२०१३ च्या विजेत्या संघाचा भाग होता.
शिखर धवन हा उत्कृष्ट फलंदाज आहे. त्याने आयपीएलमध्ये पंजाब किंग्जचे नेतृत्व केले आहे. त्याला खूप अनुभव आहे. आगामी काळात तो आपला अनुभव युवा खेळाडूंसोबत शेअर करू शकतो.
धवनकडे क्रिकेट कोचिंगमध्ये जाण्याचा पर्यायही आहे. अनेक माजी क्रिकेटपटूंनी हा मार्ग निवडला आहे. धवनच्या दिल्ली संघातील सदस्य गौतम गंभीर सध्या भारतीय संघाचा प्रशिक्षक आहे. आशिष नेहरा, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण, अशी अनेक नावे आहेत, ज्यांनी निवृत्तीनंतर कोचिंगचा मार्ग निवडला.
शिखर धवनने बिझनेसमध्ये लक्ष केंद्रित केल्यास आश्चर्य वाटणार नाही. असे मानले जाते की धवन त्याच्या DaOne गटाचा विस्तार करण्यावर लक्ष केंद्रित करू शकतो, जो दिल्ली प्रीमियर लीग संघ दक्षिण दिल्ली सुपरस्टार्सचा मालक देखील आहे.
तो फिटनेस आणि लाइफस्टाईल उद्योगात हात आजमावू शकतो. फिटनेस सेंटर्स, स्पोर्ट्स इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, वेलनेस ब्रँड्सचे काम तो पुढे नेऊ शकतो.
चित्रपट जगत आणि क्रिकेट यांचे नाते खूप जुने आहे. धवन चित्रपटांच्या दुनियेकडे वळला तर नवल वाटायला नको. त्याने सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशीच्या डबल एक्सएल चित्रपटात हुमासोबत छोटी भूमिकाही साकारली आहे. धवनच्या चाहत्यांनाही त्याने फिल्मी दुनियेत प्रवेश केल्यास खूप आनंद होईल.