Shikhar Dhawan Emotional post Son Zoravar Birthday : टीम इंडियाचा क्रिकेटपटू शिखर धवनचा मुलगा जोरावर याचा आज वाढदिवस आहे. पण या खास दिवशी शिखर आपल्या मुलाला भेटू शकत नाही. यामुळे तो चांगलाचा भावूक झालेला दिसला. धवनने सोशल मीडियावर अतिशय भावूक पोस्ट शेअर केली आहे.
धवनने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, गेल्या ३ महिन्यांपासून शिखरला सर्वत्र ब्लॉक करण्यात आले आहे, त्यामुळे तो त्याच्या वाढदिवसानिमित्त आपल्या मुलाचा फोटो शेअर करत आहे.
काही दिवसांपूर्वी शिखर धवन आणि त्याची आयशा मुखर्जी हे घटस्फोटाद्वारे वेगळे झाले. तेव्हापासून धवन आपल्या मुलाला भेटू शकलेला नाही.
आपल्या मुलासाठी लिहिलेल्या पत्रात धवनने लिहिले की, तो १ वर्षापासून जोरावरला भेटलेला नाही. याशिवाय ३ महिन्यांपासून त्याने आपल्या मुलाला कोणत्याही प्रकारे पाहिले नाही.
आपल्या मुलाला जोरावरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना धवनने लिहिले की, “मी तुला भेटून १ वर्ष झाले आहे आणि आता मला सर्वत्र ब्लॉक करून जवळपास ३ महिने झाले आहेत. म्हणून तुला शुभेच्छा देण्यासाठी मी तोच जुना फोटो शेअर करत आहे. मी आहे. माझ्या मुला, वाढदिवसाच्या शुभेच्छा."
या पत्रात धवनने पुढे लिहिले की, "मी तुला प्रत्यक्ष भेटू शकलो नसलो तरी, मी तुझ्याशी टेलिपॅथीद्वारे संपर्क साधत राहतो. मला तुझा अभिमान आहे. मला माहित आहे की तू बरा आहेस आणि मोठा होत आहेस."
गब्बरने पुढे लिहिले की, "तुझे बाबा नेहमी तुझी आठवण काढतात आणि तुझ्यावर प्रेम करतात. ते नेहमी सकारात्मक असतात आणि देवाच्या कृपेने आपण पुन्हा कधी भेटू या वेळेची वाट पाहत असतात'.