मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Shaun Marsh : आयपीएलची पहिली ऑरेंज कॅप जिंकणारा शॉन मार्श निवृत्त, या दिवशी खेळणार करिअरचा शेवटचा सामना

Shaun Marsh : आयपीएलची पहिली ऑरेंज कॅप जिंकणारा शॉन मार्श निवृत्त, या दिवशी खेळणार करिअरचा शेवटचा सामना

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 14, 2024 01:49 PM IST

Shaun Marsh Retirement : शॉन मार्शने आपल्या कारकिर्दीत अनेक संस्मरणीय विक्रम केले आहेत. तो इंडियन प्रीमियर लीगमध्येही खेळला आहे.

Shaun Marsh Retirement
Shaun Marsh Retirement (IPLT20)

Shaun Marsh Retirement : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू शॉन मार्शने प्रोफेशनल क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. बिग बॅश लीगमध्ये त्याने सिडनी थंडरविरुद्ध कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळला.

शॉन मार्शने आपल्या कारकिर्दीत अनेक संस्मरणीय विक्रम केले आहेत. तो इंडियन प्रीमियर लीगमध्येही खेळला आहे. मार्शने आयपीएलच्या पहिल्यावहिल्या सीझनची (IPL 2008) ऑरेंज कॅप जिंकली होती. त्याने आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

शॉन मार्श बिग बॅश लीगमध्ये मेलबर्न रेनेगेड्सकडून खेळत आहे. तो १७ जानेवारी रोजी सिडनी थंडर्सविरुद्ध त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळणार आहे. यानंतर तो निवृत्त होईल.

आयपीएलमध्ये उत्कृष्ट रेकॉर्ड

शॉन मार्शची आयपीएल कारकीर्दही उत्कृष्ट राहिली आहे. आयपीएलमध्ये तो फक्त पंजाब किंग्जकडून खेळला आहे. त्याने २००८ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण सामना खेळला आणि पदार्पणाच्या मोसमातच ऑरेंज कॅप जिंकली.

आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप जिंकणारा तो पहिला खेळाडू ठरला. मार्शने आयपीएलचे ७१ सामने खेळले आहेत. यात २४७७ धावा केल्या. त्याने IPL मध्ये १ शतक आणि २० अर्धशतके झळकावली आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या ११५ धावा आहे.

शॉन मार्शचे आंतरराष्ट्रीय करिअर

मार्शच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर नजर टाकली तर तीही प्रभावी राहिली आहे. त्याने ऑस्ट्रेलियासाठी ७३ एकदिवसीय सामन्यांमध्ये २७७३ धावा केल्या आहेत.

यात त्याने ७ शतके आणि १५ अर्धशतके केली आहेत. त्याची वनडेतील सर्वोत्तम धावसंख्या ही १५१ धावा आहे.

तसेच, त्याने ३८ कसोटी सामनेही खेळले आहेत. यात मार्शने २२६५ धावा केल्या. त्याची सर्वोत्तम कसोटी धावसंख्या १८२ धावा आहे. त्याने ६ शतके आणि १० अर्धशतके झळकावली. मार्शने पदार्पणाच्या वनडे सामन्यात चमकदार कामगिरी केली होती. त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध ७ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ८१ धावा केल्या होत्या.

WhatsApp channel
For latest Cricket News Live Score stay connected with HT Marathi