रणजी ट्रॉफी २०२४-२५ मध्ये गुरुवारपासून (२३ जानेवारी) मुंबई आणि जम्मू आणि काश्मीर संघ आमनेसामने आहेत. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मुंबईच्या शार्दुल ठाकूरने शानदार शतक झळकावले. शा्र्दुलचे शतक मुंबईचा संघ संकटात असताना आले. त्यांचे सर्वच स्टार फलंदाज तंबूत परतले होते. यानंतर शार्दुल आणि तनुष कोटीयन यांनी संघाचा डाव सावरला.
या सामन्याच्या पहिल्या डावातही शार्दुलने ५१ धावा केल्या होत्या. त्याच्या या ५१ धावांमुळेच मुंबईला पहिल्या डावात १०० धावांचा आकडा पार करता आला होता. शार्दुलने या सामन्यात दुसऱ्यांदा मुंबईची लाज वाजवली.
शार्दुल ठाकूर बराच काळ टीम इंडियातून बाहेर आहे. त्याने २०२३ नंतर टीम इंडियासाठी सामना खेळला नाही. त्यानंतर तो आतापर्यंत पुनरागमन करू शकला नाही.
अशा परिस्थितीत, शार्दुलने रणजी ट्रॉफीमध्ये फलंदाजीतील त्याची चमकदार कामगिरी त्याला टीम इंडियामध्ये पुनरागमन करण्याचा मार्ग खुला करू शकते. शार्दुल ठाकूरचे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील हे दुसरे शतक आहे, याशिवाय शार्दुलने १३ अर्धशतकेही झळकावली आहेत.
शार्दुलच्या या शतकाच्या जोरावर मुंबईच्या संघाला या सामन्यात पुनरागमन करता आले असून या सामन्यात त्यांनी जम्मू-काश्मीरविरुद्ध १५० हून अधिक धावांची आघाडी घेतली आहे.
मुंबईच्या फलंदाजांनी या सामन्यात अतिशय खराब फलंदाजी केली. ज्यामध्ये रोहित शर्माने २८ धावा केल्या तर यशस्वी जैस्वालने २६ धावा केल्या. कर्णधार अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यरही फ्लॉप झाले.
मुंबई संघाने दुसऱ्या डावात १०१ धावांवर ७ विकेट गमावल्या होत्या, तेथून शार्दुल ठाकूर आणि तनुष कोटियनने मुंबईच्या डाव सावरला आणि २५० धावांचा टप्पा ओलांडून सामन्यात पुनरागमन केले.
संबंधित बातम्या