Shardul Thakur Wife : टीम इंडियाचा ऑलराऊंडर शार्दुल ठाकूर हा सध्या चर्चेचा विषय आहे. आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात अनसोल्ड ठरल्यानंतर लॉर्ड ठाकूर सध्या रेड हॉट फॉर्ममध्ये आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो तुफानी कामगिरी करत आहे. शार्दुल शार्दुलने आपल्या अष्टपैलू कामगिरीने सर्वांनाच चकित केले आहे.
रणजी ट्रॉफीच्या बाद फेरीत पोहोचण्यासाठी मुंबईला मेघालयविरुद्धचा सामना जिंकणे आवश्यक आहे. सामन्यापूर्वी सर्व लक्ष रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल आणि श्रेयस अय्यर यांच्यावर होते. परंतु सामना सुरू होताच शार्दुल ठाकूरने या सर्वांना मागे टाकून प्रसिद्धी मिळवली.
शार्दुल ठाकूरने रणजी ट्रॉफीमध्ये जम्मू काश्मीरविरुद्ध सहाव्या फेरीच्या सामन्यात अर्धशतक आणि एक शतक झळकावले होते. आता त्याने ३० जानेवारीला एलिट ग्रुप डी सामन्यात मेघालयविरुद्ध हॅट्ट्रिक घेतली. त्याने ११ षटकांच्या स्पेलमध्ये ४३ धावा देत ४ बळी घेतले.
हॅट्ट्रिक घेतल्यानंतर आता शार्दुलने फलंदाजीने खळबळ उडवून दिली आणि ४२ चेंडूत ८४ धावांची जलद खेळी केली. शार्दुलने आपल्या खेळीत ९ चौकार आणि ५ गगनचुंबी षटकार मारले.
शार्दुलची पत्नी मिताली ही त्याचा कणा आहे. मिताली शार्दुलच्या वाईट काळात त्याच्यासाठी पॉवर हाऊस म्हणून काम करत असते आणि त्याचा उत्साह वाढवते.
शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली पारुलकर ही त्याची चांगली मैत्रीण तर आहेच, शिवाय पॉवर हाऊसही आहे. शार्दुल ठाकूर आणि मिताली यांची २०२१ मध्ये एंगेजमेंट झाली आणि दोन वर्षांनी म्हणजे फेब्रुवारी २०२३ मध्ये त्यांनी लग्न केले. दोघेही एकमेकांना शाळेच्या दिवसांपासून ओळखतात.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मितालीची बेकरी ठाण्यात सर्वात प्रसिद्ध आहे असून तिचे नाव ऑल जॅझ बेकरी आहे. मितालीने २०२० मध्ये याची सुरुवात केली. ती बेकरीमध्ये अनेक प्रकारचे केक, कुकीज, ब्रेड, बन्स विकते. मितालीने या व्यवसायातून २-३ कोटींची कमाई केली आहे. व्यवसायापूर्वी मितालीने कॉर्पोरेट नोकरीही केली होती. तिने एका कंपनीत कंपनी सेक्रेटरी म्हणून काम केले आहे.
मितालीचा जन्म मुंबईत १९९२ मध्ये एका उच्चवर्गीय कुटुंबात झाला. मितालीचे वडील मोठे उद्योगपती आहेत. तिचे शिक्षण मुंबईतील उच्च शाळा आणि महाविद्यालयांमध्ये झाले. कॉमर्स ग्रॅज्युएट मिताली सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्याचे जवळपास ७०.५ हजार फॉलोअर्स आहेत.
संबंधित बातम्या