Shardul Thakur : लॉर्ड शार्दुल मुंबईसाठी देवासारखं धावून आला, नवव्या क्रमांकावर येऊन ठोकलं शतक-shardul thakur century for mumbai against tamil nadu 2nd semi final ranji trophy 2024 ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Shardul Thakur : लॉर्ड शार्दुल मुंबईसाठी देवासारखं धावून आला, नवव्या क्रमांकावर येऊन ठोकलं शतक

Shardul Thakur : लॉर्ड शार्दुल मुंबईसाठी देवासारखं धावून आला, नवव्या क्रमांकावर येऊन ठोकलं शतक

Mar 03, 2024 04:58 PM IST

shardul thakur century : शार्दुल ठाकूरने रणजी ट्रॉफीतील उपांत्य फेरीच्या सामन्यात मुंबईसाठी शानदार फलंदाजी केली. तमिळनाडूविरुद्ध त्याने दमदार शतक झळकावले.

shardul thakur century
shardul thakur century

Mumbai vs Tamil Nadu, 2nd Semi Final : रणजी ट्रॉफीचा उपांत्य फेरीचा सामना मुंबई आणि तामिळानाडू यांच्यात खेळला जात आहे. आज (३ मार्च) सामन्याचा दुसरा दिवस आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मुंबईचा संघ मजबूत स्थितीत पोहोचला आहे. मुंबईने या सामन्यात मोठी आघाडी घेतली आहे.

दरम्यान, शार्दुल ठाकूर गेल्या अनेक दिवसांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. पण देशांतर्गत सामन्यांमध्ये तो चमकदार कामगिरी करत आहे. शार्दुलने रणजी ट्रॉफी २०२३-२४ च्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात शतक झळकावले आहे. त्याने १३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने १०९ धावा केल्या. 

शार्दुलच्या या खेळीच्या जोरावर मुंबईने पहिल्या डावात ३०० धावांचा टप्पा पार केला आहे. शतकाआधी शार्दुलने गोलंदाजीतही कमाल दाखवली होती. त्याने १४ षटकात २ बळी घेतले.

शार्दुलने मुंबईला सावरलं

रणजी ट्रॉफीचा दुसरा उपांत्य सामना मुंबई आणि तामिळनाडू यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात मुंबईची सुरुवात खराब झाली. सलामीवीर पृथ्वी शॉ अवघ्या ५ धावा करून बाद झाला. यानंतर भूपेन लालवानीही स्वस्तात बाद झाला. मुंबईचा संघ स्वस्ता गारद होणार असे दिसत होते, पण शार्दुलने डाव सावरला. तो ९व्या क्रमांकावर फलंदाजीला आला. 

त्याने १०५ चेंडूंचा सामना करताना १०९ धावा केल्या. त्याने १३ चौकार आणि ४ षटकार मारले. या शानदार खेळीनंतर शार्दुल बाद झाला. त्याला कुलदीप सेनने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

त्याआधी कर्णधार अजिंक्य रहाणे मुंबईसाठी विशेष काही करू शकला नाही. ६७ चेंडूत १९ धावा करून तो बाद झाला. रहाणेने २ चौकार मारले. मुशीर खानने अर्धशतक झळकावले. त्याने १३१ चेंडूंचा सामना करताना ५५ धावा केल्या. मुशीरच्या या खेळीत ६ चौकारांचा समावेश होता. यष्टिरक्षक फलंदाज हार्दिक तामोरेने ९२ चेंडूत ३५ धावा केल्या. त्याने ३ चौकार मारले.

तामिळनाडूचा पहिला डाव १४६ धावांवर आटोपला

तत्पूर्वी, या सामन्यात तामिळनाडूचा संघ १४६ धावा करून सर्वबाद झाला होता. त्यांच्याकडून वॉशिंग्टन सुंदरने ४३ धावा केल्या. सुंदरच्या खेळीत ५ चौकारांचा समावेश होता. यादरम्यान शार्दुलने मुंबईसाठी शानदार गोलंदाजी केली. त्याने १४ षटकात ४८ धावा दिल्या आणि २ बळी घेतले. तर तुषार देशपांडेने ३ बळी घेतले.

Whats_app_banner