Shardul Thakur 6 Wicket In Ranji Trophy : टीम इंडिया सध्या इंग्लंडविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ पूर्वी मेन इन ब्लूसाठी ही शेवटची एकदिवसीय मालिका आहे. या मालिकेद्वारे रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला आपले प्लेइंग इलेव्हन निश्चित करावे लागणार आहे.
भारताची फलंदाजी उत्कृष्ट दिसत आहे, पण गोलंदाजीत ती ताकद अजून दिसलेली नाही. गोलंदाजी कमकुवत दिसण्याचे मुख्य कारण म्हणजे जसप्रीत बुमराहची अनुपस्थिती.
या दरम्यानच, आता टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने ६ विकेट घेऊन खळबळ माजवली आहे.
शार्दुल ठाकूर रणजी ट्रॉफी २०२४-२५ च्या उपांत्यपूर्व फेरीत खेळत आहे. शार्दुलने मुंबईकडून हरियाणाविरुद्धच्या पहिल्या डावात आश्चर्यकारक कामगिरी करत ६ विकेट घेतल्या, त्यामुळे हरियाणाचा संघ ३०१ धावांवर ऑलआऊट झाला. मुंबईने त्यांच्या पहिल्या डावात ३१५ धावा केल्या होत्या.
शार्दुलने १८.५ षटकात ५८ धावा देत ६ विकेट घेतल्या. यादरम्यान त्याने ३ मेडन षटकेही टाकली. रणजी उपांत्यपूर्व फेरीसारख्या महत्त्वाच्या सामन्यात शार्दुलच्या या कामगिरीकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
तर चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ११ फेब्रुवारीपर्यंत प्रत्येक संघ त्यांच्या स्क्वाडमध्ये बदल करू शकतात.
टीम इंडियाचा मुख्य वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळत नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी बुमराहला निश्चितपणे टीम इंडियाचा भाग बनवण्यात आले आहे, परंतु अद्याप त्याच्या फिटनेसबाबत कोणतेही ठोस अपडेट मिळालेले नाही.
जर बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तंदुरुस्त होऊ शकला नाही तर भारतासाठी हा मोठा धक्का असेल.
याशिवाय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हा दुखापतीतून परतला आहे. इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील सुरुवातीचे दोन्ही सामने तो खेळला, पण शमीला विशेष लय साधता आली नाही. याशिवाय हर्षित राणाने इंग्लंड मालिकेद्वारे वनडेमध्ये पदार्पण केले. हर्षितने २ सामन्यात ४ विकेट्स नक्कीच घेतल्या, पण तो महागडाही ठरला.
संबंधित बातम्या