SA vs PAK : शान मसूदने दक्षिण आफ्रिकेत इतिहास रचला, अशी कामगिरी करणारा पहिला पाकिस्तानी कर्णधार ठरला
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  SA vs PAK : शान मसूदने दक्षिण आफ्रिकेत इतिहास रचला, अशी कामगिरी करणारा पहिला पाकिस्तानी कर्णधार ठरला

SA vs PAK : शान मसूदने दक्षिण आफ्रिकेत इतिहास रचला, अशी कामगिरी करणारा पहिला पाकिस्तानी कर्णधार ठरला

Jan 06, 2025 08:05 PM IST

Pakistan vs South Africa Test : पाकिस्तानकडून दुसऱ्या डावात कर्णधार शान मसूद याने शतकी खेळी केली. त्याने २४५ चेंडूत १४१ धावांची खेळी खेळली. तो क्वेना मफाकाच्या गोलंदाजीवर पायचीत झाला.

SA vs PAK : शान मसूदने दक्षिण आफ्रिकेत इतिहास रचला, अशी कामगिरी करणारा पहिला पाकिस्तानी कर्णधार ठरला
SA vs PAK : शान मसूदने दक्षिण आफ्रिकेत इतिहास रचला, अशी कामगिरी करणारा पहिला पाकिस्तानी कर्णधार ठरला (AP)

Shan Masood Century : दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरा कसोटी सामना केपटाऊन येथे खेळला जात आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात ६१५ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा पहिला डाव १९४ धावांवर गारद झाला. यानंतर दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानला फॉलऑन खेळायला लावले. फॉलोऑन खेळताना पाकिस्तानने जबरदस्त फलंदाजी केली.

कर्णधार शान मसूदच्या ऐतिहासिक शतकाच्या जोरावर पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात जबरदस्त पलटवार केला. हे वृत्त लिहीपर्यंत पाकिस्तानने ६ गडी गमावून ४४१ धावा केल्या होत्या. पाकिस्तान अजूनही २० धावांनी पिछाडीवर आहे.

दरम्यान, पाकिस्तानकडून दुसऱ्या डावात कर्णधार शान मसूद याने शतकी खेळी केली. त्याने २४५ चेंडूत १४१ धावांची खेळी खेळली. तो क्वेना मफाकाच्या गोलंदाजीवर पायचीत झाला.

या शतकासह शान मसूद याने एक महाविक्रम आपल्या नावे केला आहे. शान मसूद हा आता दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर कसोटी शतक झळकावणारा पहिला पाकिस्तानी कर्णधार ठरला आहे. मसूदने न्यूलँड्स येथे कारकिर्दीतील सहावे कसोटी शतक झळकावले.

शान मसूदने नवा विक्रम केला

शान मसूदच्या आधी सलीम मलिक १९९५ मध्ये दक्षिण आफ्रिकेत ९९ धावांवर बाद झाला होता तेव्हा त्याचे शतक हुकले होते. यानंतर २००७ मध्ये इंझमाम-उल-हकला दक्षिण आफ्रिकेत शतक झळकावणारा पहिला पाकिस्तानी कर्णधार बनण्याची संधी होती. मात्र दुसऱ्या टोकाकडून साथ न मिळाल्याने तो ९२ धावांवर नाबाद परतला.

दक्षिण आफ्रिकेत पाकिस्तानी कर्णधारांची सर्वोच्च धावसंख्या:

शान मसूद: २०२५ मध्ये १४१

सलीम मलिक : १९९५ मध्ये ९९

इंझमाम-उल-हक: २००७ मध्ये ९२*

मिसबाह-उल-हक: २०१३ मध्ये ६४

सर्फराज अहमद: २०१९ मध्ये ५६

दक्षिण आफ्रिका WTC फायनलमध्ये

या सामन्यात शान मसूदसोबत बाबर आझमनेही चांगली फलंदाजी केली. बाबर ८१ धावा करून बाद झाला. या दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी २०५ धावांची भागीदारी झाली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वीच वेगवान गोलंदाज मार्को यान्सनने बाबरला बाद केले होते. आज सामन्याचा चौथा दिवस आहे.

पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेच्या ६१५ धावांच्या प्रत्युत्तरात पाकिस्तान अवघ्या १९४ धावांवर आटोपला. यानंतर पाकिस्तानला फॉलोऑन खेळावा लागला. या मालिकेतील पहिला सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेने जूनमध्ये लॉर्ड्स येथे होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. WTC फायनलमध्ये त्यांचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या