मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Video : स्टार्कच्या यॉर्करने शमार जोसेफचा अंगठा तुटला, वेदनेने विव्हळत फलंदाज मैदानाबाहेर गेला

Video : स्टार्कच्या यॉर्करने शमार जोसेफचा अंगठा तुटला, वेदनेने विव्हळत फलंदाज मैदानाबाहेर गेला

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 27, 2024 08:30 PM IST

Shamar Joseph vs Mitchell Starc : ऑस्ट्रेलियन गोलंदाजीसमोर वेस्ट इंडिजचे फलंदाज पूर्णपणे हतबल दिसत होते. या दरम्यान मिचेल स्टार्कच्या एका घातक यॉर्करने वेस्ट इंडिजचा फलंदाज शमार जोसेफला गंभीररित्या जखमी केले आहे.

Shamar Joseph vs Mitchell Starc
Shamar Joseph vs Mitchell Starc

Aus vs WI test day 3 scorecard : ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना ब्रिस्बेनमधील गाबा येथे खेळवला जात आहे. या दिवसरात्र कसोटी सामन्यावर ऑस्ट्रेलियनाने मजबूत पकड निर्माण केली आहे.

ही कसोटी जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियासमोर २१६ धावांचे लक्ष्य आहे. या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने आज (२७ जानेवारी) तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत २ बाद ६० धावा केल्या होत्या. स्टीव्ह स्मिथ ३३ आणि कॅमेरून ग्रीन ९ धावांवर नाबाद परतले आहेत.

शमार जोसेफचा अंगठा चिरडला गेला

तत्पूर्वी, आज वेस्ट इंडिजचा दुसरा डाव १९३ धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजीसमोर वेस्ट इंडिजचे फलंदाज पूर्णपणे हतबल दिसत होते. या दरम्यान मिचेल स्टार्कच्या एका घातक यॉर्करने वेस्ट इंडिजचा फलंदाज शमार जोसेफला गंभीररित्या जखमी केले आहे. स्टार्कचा यॉर्कर इतका खतरनाक होता, की चेंडू शमार जोसेफच्या अंगठ्यावर आदळला आणि अंगठ्यातून रक्त येऊ लागले.

७३व्या षटकात घडली घटना

मिचेल स्टार्क वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावातील ७३ वे षटक टाकण्यासाठी आला होता. तेव्हा या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर शमार जोसेफ स्ट्राइकवर होता. स्टार्कने शमारला धारदार यॉर्कर टाकला, हा यॉर्कर थेट त्याच्या बुटावर आदळला. स्टार्कने लगेच LBW साठी अपील केले आणि अंपायरने त्याला आऊट दिले, पण शमारने रिव्ह्यू घेतला. रिव्ह्यूमध्ये शमार जोसेफ नाबाद ठरला. पण त्याच्या पायातून रक्त येते होते, त्यामुळे तो रिटायर हर्ट होऊन पव्हेलियनमध्ये परतला.अशाप्रकारे शमार जोसेफ रिटायर्ड हर्ट झाल्याने वेस्ट इंडिजचा डाव १९३ धावांवर थांबला.

WhatsApp channel
For latest Cricket News Live Score stay connected with HT Marathi