Shaheen Afridi VIDEO : मुलाच्या जन्मानंतर शाहीन आफ्रिदीला मिळाल्या दोन विकेट, पठ्ठ्याचं सेलिब्रेशन तर बघा!
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Shaheen Afridi VIDEO : मुलाच्या जन्मानंतर शाहीन आफ्रिदीला मिळाल्या दोन विकेट, पठ्ठ्याचं सेलिब्रेशन तर बघा!

Shaheen Afridi VIDEO : मुलाच्या जन्मानंतर शाहीन आफ्रिदीला मिळाल्या दोन विकेट, पठ्ठ्याचं सेलिब्रेशन तर बघा!

Aug 24, 2024 06:54 PM IST

शाहीन आफ्रिदीच्या पत्नीने नुकतेच एका मुलाला जन्म दिला आहे. बांगलादेशविरुद्ध विकेट घेतल्यानंतर शाहीनने खास सेलिब्रेशन केले.

Shaheen Afridi VIDEO : मुलाच्या जन्मानंतर शाहीन आफ्रिदीला मिळाल्या दोन विकेट, पठ्ठ्याचं सेलिब्रेशन तर बघा
Shaheen Afridi VIDEO : मुलाच्या जन्मानंतर शाहीन आफ्रिदीला मिळाल्या दोन विकेट, पठ्ठ्याचं सेलिब्रेशन तर बघा

पाकिस्तानी क्रिकेटर शाहीन आफ्रिदी याची पत्नी अंशा आफ्रिदीने नुकतेच एका मुलाला जन्म दिला आहे. शाहीन बाप झाल्यानंतर अनेक क्रिकेटपटूंनी शाहीनचे अभिनंदन केले आहे. आता शाहीनने मुलाच्या जन्माचा आनंद एका खास पद्धतीने व्यक्त केला आहे.

शाहीन सध्या रावळपिंडी येथे पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात कसोटी सामना खेळत आहे. आज सामन्याचा चौथा दिवस होता. या कसोटीनंतर तो आपल्या मुलाला भेटायला जाऊ शकतो आणि उर्वरित मालिकेतून ब्रेक घेऊ शकतो.

दरम्यान, मुलाच्या जन्मानंतर त्याने विकेट घेतली आणि खास पद्धतीने सेलिब्रेशन केले. शाहीनने मैदानावर दोन्ही हात हलवत सेलिब्रेशन केले आणि चाहत्यांची मने जिंकली. शाहीनबाबत सोशल मीडियावर अनेक पोस्ट शेअर करण्यात आल्या आहेत.

शाहीन आफ्रिदीचं गोड सेलिब्रेशन

वास्तविक, बांगलादेशच्या डावात हसन महमूद नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. या डावात त्याने १८ चेंडूंचा सामना केला. मात्र एकही धाव काढता आली नाही. शाहीन आफ्रिदी पाकिस्तानसाठी १६३ वे षटक टाकत होता. या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर हसनला शॉट खेळायचा होता. पण चेंडू त्याच्या बॅटला लागून यष्टिरक्षक मोहम्मद रिझवानच्या हातात गेला आणि तो शून्यावर बाद झाला.

विकेट घेतल्यानंतर शाहीनने मुलाच्या जन्माचे सेलिब्रेशन केले. शाहीनचा हा व्हिडिओ पाकिस्तान क्रिकेट टीमने X वर शेअर केला आहे. त्याला आतापर्यंत हजारो चाहत्यांनी लाईक केले आहे. अनेक चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.

तिसऱ्या दिवशी शाहीनला विकेट मिळाली नाही

विशेष म्हणजे, शाहीनने ३० षटके गोलंदाजी केली. त्याने सामन्याच्या तिसऱ्या दिवशी २० षटके गोलंदाजी केली, पण त्याला एकही विकेट घेता आली नव्हती. पण मुलाच्या जन्मानंतर आज त्याने दोन विकेट घेतल्या.

पाकिस्तानने पहिला डाव ६ बाद ४४८ धावांवर घोषित केला होता. पाकिस्तानकडून रिझवानने नाबाद १७१ धावा केल्या होत्या. तर सौद शकीलने १४१ धावांची खेळी केली होती.

बांगलादेशची दमदार फलंदाजी

प्रत्युत्तरात बांगलादेशने पहिल्या डावात दमदार फलंदाजी करत सर्वबाद ५६५ धावा केल्या. बांगलादेशने पहिल्या डावात ११७ धावांची आघाडी घेतली. त्यांच्याकडून मुशफिकुर रहीमने १९१ धावांची खेळी केली. त्याने २२ चौकार आणि १ षटकार मारला. तर सदमान इस्लामने ९३ धावांची खेळी केली.

मुशफिकुर रहीमने ३४१ चेंडूंचा सामना करताना २२ चौकार आणि १ षटकार मारला. त्याने बांगलादेशला ५०० धावांच्या पुढे नेले. लिटन दास आणि मेहदी हसन मिर्झा यांच्यासोबत मुशफिकुरने चांगली भागीदारी केली. रहीमशिवाय बांगलादेशकडून लिटन दासने ७८ चेंडूंचा सामना करत ५६ धावा केल्या. त्याने ८ चौकार आणि १ षटकार मारला. मोमिनुलने ५० धावांची खेळी खेळली. इस्लामने १८३ चेंडूंचा सामना करताना ९३ धावा केल्या. मेहदी हसनने १७९ चेंडूत ७७ धावा केल्या. त्याने ६ चौकार मारले.

Whats_app_banner