ICC ODI World Cup 2023 New Zealand vs Pakistan : क्रिकेट वर्ल्डकपमध्ये आज (४ नोव्हेंबर) पाकिस्तान आणि न्यूझीलंड आमने सामने आहेत. बंगळुरूच्या चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियमवर पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली.
बाबरचा हा निर्णय चांगलाच अंगलट आला. कारण न्यूझीलंडच्या फलंदाजांनी ५० षटकात ६ बाद ४०१ धावा ठोकल्या. न्यूझीलंडकडून सलामीवीर रचिन रविंद्रने शतकी खेळी खेळली तर कर्णधार केन विल्यमसनने ९५ धावा केल्या.
न्यूझीलंडच्या फलंदाजांनी पाकिस्तानच्या सर्वच गोलंदाजांची जबरदस्त धुलाई केली. आता पाकिस्तानचे प्रमुख गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी आणि हरिस रौफ यांच्या नावार एक नकोसा विक्रम झाला आहे. हे दोन्ही गोलंदाज विश्वचषक सामन्यात पाकिस्तानसाठी सर्वात महागडे गोलंदाज ठरले आहे.
हरिस रौफने १० षटकात ८५ धावा दिल्या तर शाहीन आफ्रिदीने १० षटकात ९० धावा दिल्या. यादरम्यान शाहीनला एकही विकेट मिळाली नाही तर हरिसला एक विकेट मिळाला.
हरीस आणि शाहीनने हसन अलीचा विक्रम मोडला. हसन अलीने २०१९ विश्वचषकातील भारताविरुद्धच्या सामन्यात १० षटकात १ बळी घेत ८४ धावा दिल्या होत्या.
याच विश्वचषकात हरिस रौफने ऑस्ट्रेलियाविरुद्ध बेंगळुरू येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात १० षटकात ८३ धावा दिल्या होत्या. मात्र, त्यावेळी त्याने ३ विकेट्सही घेतल्या होत्या.
शाहीन आफ्रिदी- न्यूझीलंडविरुद्ध १० षटकात ९० धावा, (बंगळुरू) २०२३
हारिस रौफ- न्यूझीलंडविरुद्ध १० षटकात १/८५ धावा, (बंगळुरू) २०२३
हसन अली- भारताविरुद्ध १० षटकात १/८४ धावा, (मँचेस्टर) २०१९
हारिस रौफ- ऑस्ट्रेलियाविरुद्ध, ३/८३ (बेंगळुरू) २०२३
शाहीनने आज लाजिरवाणा विक्रम तर केलाच. शिवाय त्याला पहिल्यांदाच वर्ल्डकप सामन्यात एकही विकेट मिळाली नाही. त्याच्या २४ वर्ल्डकप डावानंतर असे घडले आहे. सोबतच हारिस रौफने आपल्या गोलंदाजीवर या वर्ल्डकपमध्ये १६ षटकार खाल्ले आहेत. हादेखील एक विक्रमच आहे.
संबंधित बातम्या