Viral Video : लेडी बुमराह बघितली का? शाळेच्या गणवेशात कॉपी केली बुमराहची बॉलिंग अ‍ॅक्शन, एकदा पाहाच!-school girl copy jasprit bumrah bowling action in uniform watch lady bumrah video here ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Viral Video : लेडी बुमराह बघितली का? शाळेच्या गणवेशात कॉपी केली बुमराहची बॉलिंग अ‍ॅक्शन, एकदा पाहाच!

Viral Video : लेडी बुमराह बघितली का? शाळेच्या गणवेशात कॉपी केली बुमराहची बॉलिंग अ‍ॅक्शन, एकदा पाहाच!

Aug 17, 2024 09:45 PM IST

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक शाळकरी मुलगी भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या ॲक्शनची कॉपी करताना दिसत आहे.

Viral Video : लेडी बुमराह बघितली का? शाळेच्या गणवेशात कॉपी केली बुमराहची बॉलिंग अ‍ॅक्शन, एकदा पाहाच!
Viral Video : लेडी बुमराह बघितली का? शाळेच्या गणवेशात कॉपी केली बुमराहची बॉलिंग अ‍ॅक्शन, एकदा पाहाच!

जसप्रीत बुमराह सध्या जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. बुमराहने आपल्या तुफानी गोलंदाजीच्या बळावर भारताला टी-20 विश्वचषक २०२४ चे विजेतेपद मिळवून दिले. बुमराह एक अद्वितीय गोलंदाज आहे. त्याची ॲक्शन आणि गोलंदाजी खूप वेगळी आहे, ज्याची प्रत्येक युवा क्रिकेटर कॉपी करण्याचा प्रयत्न करतो.

आता एका शाळकरी मुलीने बुमराहच्या ॲक्शनची शानदार कॉपी केली आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शाळेच्या गणवेशात गोलंदाजी करणाऱ्या या मुलीने बुमराहच्या ॲक्शनची खूप छान नक्कल केली आहे. केवळ ॲक्शनच नाही तर शाळकरी मुलीने नेटमध्येही चमकदार गोलंदाजी केली.

ॲक्शन व्यतिरिक्त, स्कूल गर्लचा रनअप देखील बुमराहसारखाच होता. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, लेडी बुमराहचा चेंडू बॅट्समनला सहज खेळता येत नाही.

बुमराह सध्या विश्रांतीवर

जसप्रीत बुमराहने टीम इंडियासाठी शेवटचा सामना २०२४ टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये खेळला होता. तेव्हापासून भारतीय वेगवान गोलंदाज विश्रांतीवर आहे. T20 विश्वचषकानंतर टीम इंडियाने झिम्बाब्वे दौऱ्यावर ५ टी-20 सामन्यांची मालिका खेळली. त्यानंतर श्रीलंका दौऱ्यावर तीन सामन्यांची टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळवली गेली. बुमराहला या कोणत्याही मालिकेत टीम इंडियाचा भाग बनवण्यात आले नाही.

बुमराहची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

जसप्रीत बुमराह सध्या भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज आहे, जो तिन्ही फॉरमॅट खेळतो. भारतीय वेगवान गोलंदाजाने आतापर्यंत ३६ कसोटी, ८९एकदिवसीय आणि ७० टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. बुमराहने कसोटीत १५९ विकेट घेतल्या आहेत. याशिवाय त्याने एकदिवसीय सामन्यात १४९ आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात ८९ विकेट्स घेतल्या आहेत.