मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  SAT20 League 2024: उद्यापासून रंगणार दक्षिण आफ्रिका टी-२० लीगचा थरार, ट्रॉफीसाठी ६ संघात लढत!

SAT20 League 2024: उद्यापासून रंगणार दक्षिण आफ्रिका टी-२० लीगचा थरार, ट्रॉफीसाठी ६ संघात लढत!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 09, 2024 06:17 PM IST

SAT20 League 2024 Squads: दक्षिण आफ्रिका टी-२० लीगच्या दुसऱ्या हंगामातील पहिल्याच सामन्यात जोहान्सबर्ग सुपर किंग्ज आणि सनरायझर्स इस्टर्न केप यांच्यात सामना खेळला जाणार आहे.

Joburg Super Kings
Joburg Super Kings

SAT20 League Second Season: दक्षिण आफ्रिका टी-२० लीगच्या दुसऱ्या हंगामाला उद्यापासून सुरुवात होत आहे. या हंगामातील पहिल्या सामन्यात जोहान्सबर्ग सुपर किंग्ज आणि सनरायझर्स इस्टर्न केप हे संघ एकमेकांशी भिडतील. हा सामना सेंट जॉर्ज पार्क येथे खेळला जाणार आहे. या लीगच्या पहिल्या हंगामात सनरायझर्स इस्टर्न केपने बाजी मारली होती. तर, जोहान्सबर्ग सुपर किंग्जचा संघाला उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागला होता.

दरम्यान, गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही ६ संघ ट्रॉफीसाठी एकमेकांशी भिडतील, ज्यात डर्बन सुपर जायंट्स, जोहान्सबर्ग सुपर किंग्स, एमआय केप टाऊन, पारल रॉयल्स, प्रिटोरिया कॅपिटल्स आणि सनरायझर्स इस्टर्न केप यांचा समावेश आहे.

Arjuna Award: राष्ट्रपतींनी मोहम्मद शामीला केलं सन्मानित; अर्जुन पुरस्कार मिळवणारा ५८वा क्रिकेटपटू

संघ:

डर्बन सुपर जायंट्स-

केशव महाराज (कर्णधार), क्विंटन डी कॉक, काइल मेयर्स, नवीन-उल-हक, रीस टोपले, हेनरिक क्लासेन, ड्वेन प्रिटोरियस, कीमो पॉल, भानुका राजपक्षे, दिलशान मदुशंका, काइल अॅबॉट, ज्युनियर डाला, जेजे स्मट्स, प्रीनेलॉन सुब्रेन, मॅथेलॉन ब्रिट्झके आणि व्हियान मुल्डर

 

जोहान्सबर्ग सुपर किंग्ज-

फाफ डू प्लेसिस (कर्णधार), जेराल्ड कोएत्झी, मोईन अली, लुईस डू प्लॉय, रीझा हेंड्रिक्स, लिझाद विल्यम्स, नांद्रे बर्जर, डोनोव्हान फरेरा, आरोन फांगीसो, बोंगमुसा मखान्या, काइल सिमंड्स.

 

एमआय केप टाऊन-

रशीद खान, सॅम कुरन, कागिसो रबाडा, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, लियाम लिव्हिंगस्टोन, जोफ्रा आर्चर, ऑली स्टोन, जॉर्ज लिंडे, ब्युरॉन हेंड्रिक्स, डुआन जेन्सन, डेवाल्ड ब्रेविस, रायन रिक्लेटन, ग्रँट रोएलॉफसेन, डेलानो पोटगीटर, टॉम बँटन.

 

पार्ल रॉयल्स-

डेव्हिड मिलर, इव्हान जोन्स, विहान लुब्बे, अँडिले फेहलुकवायो, जेसन रॉय, फेरीस्को अॅडम्स, मिचेल व्हॅन बुरेन, डेन विलास, जोस बटलर, ब्योर्न फॉर्च्युइन, कोडी युसुफ, क्वेना म्फाका, लुंगी एनगिडी, ओबेद मॅककॉय, तबरेझ शम्सी

 

प्रिटोरिया कॅपिटल्स-

विल जॅक, शेन डॅड्सवेल, थ्युनिस डी ब्रुयन, जेम्स नीशम, सेनुरन मुथुसामी, कॉलिन इंग्राम, कॉर्बिन बॉश, आदिल रशीद, अॅनरिक नॉर्टजे, एथन बॉश, वेन पारनेल, मिगुएल प्रिटोरियस, रिले रूसो.

सनरायझर्स इस्टर्न केप-

एडन मार्कराम, टेम्बा बावुमा, ओटनीएल बार्टमन, ट्रिस्टन स्टब्स, सिसांडा मॅगाला, मार्को जॅन्सन, अॅडम रॉसिंग्टन, ब्रायडन कारसे, सारेल एरवी, अयाबुलेला गकमाने, टॉम एबेल, जॉर्डन हरमन, लियाम डॉसन, सायमन हार्मर, डेव्हिड मलान.

WhatsApp channel

विभाग

For latest Cricket News Live Score stay connected with HT Marathi