मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  खत्म कर जल्दी, ऊपर बर्फ है घूमने चलेंगे… सरफराजनं इंग्लंडच्या बशीरला डिवचलं, पुढे काय घडलं? पाहा

खत्म कर जल्दी, ऊपर बर्फ है घूमने चलेंगे… सरफराजनं इंग्लंडच्या बशीरला डिवचलं, पुढे काय घडलं? पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 10, 2024 11:50 AM IST

sarfaraz khan shoaib bashir : भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळली गेली. या मालिकेतील शेवटच्या सामन्यात टीम इंडियाने इंग्लंचा एक डाव आणि ६४ धावांनी पराभव केला.

sarfaraz khan shoaib bashir : खत्म कर जल्दी, ऊपर बर्फ है घूमने चलेंगे… सरफराजनं इंग्लंडच्या बशीरला डिवचलं, पुढे काय घडलं? पाहा
sarfaraz khan shoaib bashir : खत्म कर जल्दी, ऊपर बर्फ है घूमने चलेंगे… सरफराजनं इंग्लंडच्या बशीरला डिवचलं, पुढे काय घडलं? पाहा (BCCI Twitter)

धरमशाला कसोटी सामन्यात टीम इंडियाने आपल्या दमदार खेळाच्या जोरावर इंग्लंडच्या बॅझबॉलचा अवघ्या तीन दिवसात धुव्वा उडवला. भारतीय संघाने तिसऱ्याच दिवशी एक डाव आणि ६४ धावांनी सामना जिंकला.

या दमदार विजयासोबतच टीम इंडियाच्या खेळाडूंनी इंग्लंडचा खेळाडूंना स्लेजिंगनेही चांगलेच त्रस्त केले. असाच काहीसा प्रकार इंग्लंडच्या दुसऱ्या डावाच्या ३५व्या षटकात शोएब बशीर फलंदाजीसाठी मैदानात आला तेव्हा पाहायला मिळाला.

'लवकर संपव, वर बर्फ आहे, फिरायला जाऊया.'

लंचआधीच इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला होता. यानंतर दुसऱ्या सत्राच्या तासाभरातच आणखी ३ विकेट पडल्या. भारत हा सामना जिंकणार हे सर्वांनाच माहीत होते. धरमशाला मैदानात उपस्थित प्रेक्षकही भारतीय संघाच्या विजयाच्या जल्लोष करत होते. या दरम्यान, टीम इंडियाच्या सरफराज खानने शोएब बशीरला वाईटरित्या ट्रोल केले, या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये सर्फराज खान बशीरला स्लेजिंग करताना दिसत आहे. बशीर १०व्या नंबरवर फलंदीजाला आला होता. त्यावेळी कुलदीप यादव इंग्लंडच्या डावाचे ३८वे षटक टाकत होता. बशीर येताच फॉरवर्ड शॉर्ट लेगवर उभा असलेला सरफराज खान त्याला म्हणाला, खत्म कर जल्दी, ऊपर बर्फ है घूमने चलेंगे'. सरफराज खानचे बोलणे ऐकून कुलदीप यादवलाही हसू आवरता आले नाही. तसेच, हा आवाज स्टंप माइकमधून टीव्हीवरील प्रेक्षकांपर्यंतही पोहोचला.

जडेजाने बशीरला बोल्ड केले

या घटनेनंतर अवघ्या काही षटकांत रवींद्र जडेजाने बशीरला क्लीन बोल्ड केले. पण आपण बोल्ड झालो आहोत, हे बशीरला समजलेच नाही. त्याला वाटले की, भारतीय खेळाडू झेलबादचे अपील करत आहेत. त्यामुळे त्याने अंपायरकडे रिव्ह्यूचा इशारा केला. पण जो रूटने त्याला सांगितले की तो क्लीन बोल्ड झाला आहे. यानंतर बशीर व्हीएपी पॅव्हेलियनकडे परतला.

 

WhatsApp channel