बंगळुरू कसोटीच्या चौथ्या दिवशी (१९ ऑक्टोबर) सरफराज खानने शानदार शतक झळकावले. सरफराज खानने १९५ चेंडूत १५० धावांची शानदार खेळी रचली. त्याने आपल्या खेळीत १८ चौकार आणि ३ षटकार मारले. या शानदार शतकानंतर सर्फराज खानला टीम साऊदीने आपला शिकार बनवले. सर्फराज खानचे कसोटी फॉरमॅटमधील हे पहिले शतक आहे.
याशिवाय त्याने तीनदा पन्नास धावांचा टप्पा ओलांडला आहे. सर्फराज खान त्याच्या शतकानंतर चांगलाच चर्चेत आला आहे. या शतकानंतर सरफराज खान भारताचा मोठा सुपरस्टार बनणार असल्याचे क्रिकेट तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
सर्फराज खान त्याच्या शतकानंतर सोशल मीडियावर सतत ट्रेंड करत आहे. सोशल मीडिया यूजर्सही सरफराज खानचे तोंडभरून कौतुक करत आहेत. त्याचवेळी, सर्फराज खानच्या शतकी खेळीनंतर बंगळुरू कसोटी रोमांचक वळणावर पोहोचली आहे.
न्यूझीलंडला सामना जिंकण्यासाठी आज (२० ऑक्टोबर) शेवटच्या दिवशी १०७ धावा करायच्या आहेत. वृत्त लिहेपर्यंत न्यूझीलंडने १ विकेटवर २ धावा केल्या आहेत. सध्या डेव्हॉन कॉनवे आणि विल यंग क्रीजवर आहेत. बुमराह आणि सिराज आग ओकणारी गोलंदाजी करत आहेत.
दरम्यान, पहिल्या डावात भारतीय संघ फक्त ४६ धावांवरच गारद झाला होता. याला प्रत्युत्तर म्हणून न्यूझीलंडने पहिल्या डावात ४०२ धावा केल्या. अशा प्रकारे न्यूझीलंडला ३५६ धावांची मोठी आघाडी मिळाली. त्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी शानदार पलटवार केला. भारताने दुसऱ्या डावात ४६२ धावा केल्या.
विराट कोहलीने ७० धावांची शानदार खेळी केली. तर सर्फराज खान १५० धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. ऋषभ पंतचे शतक अवघ्या १ धावेने हुकले. ऋषभ पंत ९९ धावा करून विल्यम ओरुकेचा बळी ठरला.s
संबंधित बातम्या