टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून (२४ ऑक्टोबर) पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथम याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सध्या रचिन रवींद्र आणि डेव्हॉन कॉनवे फलंदाजी करत आहेत.
उपाहारापर्यंत न्यूझीलंड संघाची धावसंख्या ९२ धावांवर पोहोचली आहे. त्यांच्या २ विकेट पडल्या आहेत.
दरम्यान, न्यूझीलंडची दुसरी सरफराज खान याच्यामुळे भारताच्या पारड्यात पडली. कारण सरफारज याच्याशिवाय फलंदाज बाद झाल्याचे गोलंदाजासह इतर कोणत्याही खेळाडूला समजले नव्हते.
वास्तविक, न्यूझीलंडच्या डावातील २४वे षटक टाकले जात होते. गोलंदाज रविचंद्रन अश्विन याने शेवटचा चेंडू टाकला. चेंडू लेगस्टंपच्या बाहेर होता. यावर विल यंगने लेगसाईडच्या दिशेने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. पण तो बीट झाला आणि चेंडू यष्टिरक्षकाने चेंडू पकडला. स्लिपमध्ये उभ्या असलेल्या कर्णधार रोहित शर्मा आणि कीपर ऋषभ पंत यांनी कोणतेही अपील केले नाही. पण शॉर्ट लेग क्षेत्ररक्षक सर्फराज खान याने जोरदार अपील केली, यावर पंचांनी नॉट आऊट घोषित केले.
पण यानंतर सरफराज कर्णधार रोहित शर्माकडे गेला आणि हट्ट करू लागला. त्याच्या मागे क्षेत्ररक्षण करणाऱ्या विराट कोहलीचीही त्याला साथ लाभली. या दोघांचा जिद्द पाहून रोहित शर्मालाही नकार देता आला नाही. ५ सेकंद शिल्लक असताना, त्याने निर्णय DRL घेण्याचा इशारा केला.
यानंतर चाहत्यांसोबत टीम इंडियाचे खेळाडूही श्वास रोखून स्क्रीनकडे बघत होते. रिप्लेमध्ये काहीही स्पष्टपणे समजले नाही. पण यानंतर स्निकोमीटर आला. जेव्हा चेंडू विल यंगच्या ग्लोव्हजजवळ होता, तेव्हा स्नीकोमीटरने हालचाल दाखवली. यानंतर संपूर्ण महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये जोरदार जल्लोष झाला. मैदानावर उपस्थित टीम इंडियाच्या खेळाडूंच्या आनंदाला सीमा नव्हती. तिसऱ्या पंचाच्या निर्णयानुसार मैदानावरील पंचांनी आपला निर्णय बदलला आणि विल यंगला आऊट दिले.
पुणे कसोटीच्या पहिल्या सत्रात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चांगली लढत झाली. न्यूझीलंडने ३१ षटकांत ९२ धावा केल्या. उपाहाराची घोषणा झाली तेव्हा डेव्हॉन कॉनवे ४७ धावांवर खेळत होता. टॉम लॅथम १५ धावा करून आणि विल यंग १८ धावा करून बाद झाला. टॉम लॅथमलाही अश्विनने बाद केले.
संबंधित बातम्या