IPL च्या आधीच सरफराज आणि ध्रुव जुरेलला मिळाली खास भेट, BCCI ने घेतला मोठा निर्णय-sarfaraz khan and dhruv jurel added in bcci c grade annual contract before ipl 2024 indian cricket team ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IPL च्या आधीच सरफराज आणि ध्रुव जुरेलला मिळाली खास भेट, BCCI ने घेतला मोठा निर्णय

IPL च्या आधीच सरफराज आणि ध्रुव जुरेलला मिळाली खास भेट, BCCI ने घेतला मोठा निर्णय

Mar 19, 2024 02:18 PM IST

sarfaraz khan and dhruv jurel : सरफराज आणि जुरेल यांचा भारतीय क्रिकेट संघाच्या केंद्रीय करारात समावेश करण्यात आला आहे. सोमवारी (१८ मार्च) बीसीसीआयच्या बैठकीत या दोघांनाही केंद्रीय कराराचा भाग बनवण्याचा निर्णय घेण्यात आला.

sarfaraz khan and dhruv jurel सरफराज आणि ध्रुव जुरेलला आयपीएलपूर्वी मिळाली खास भेट, BCCI ने घेतला मोठा निर्णय
sarfaraz khan and dhruv jurel सरफराज आणि ध्रुव जुरेलला आयपीएलपूर्वी मिळाली खास भेट, BCCI ने घेतला मोठा निर्णय (REUTERS)

sarfaraz and dhruv jurel bcci annual contract : सरफराज खान आणि ध्रुव जुरेल यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) विशेष भेट देऊन गौरविले आहे. आयपीएल २०२४ सुरू होण्यापूर्वी बीसीसीआयने दोन्ही खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांचा वर्षाव केलाआहे. 

वास्तविक, सरफराज आणि जुरेल यांचा भारतीय क्रिकेट संघाच्या केंद्रीय करारात समावेश करण्यात आला आहे. सोमवारी (१८ मार्च) बीसीसीआयच्या बैठकीत या दोघांनाही केंद्रीय कराराचा भाग बनवण्याचा निर्णय घेण्यात आला.

नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या दोन्ही खेळाडूंना बीसीसीआयचा 'सी' ग्रेड करार देण्यात आला आहे. बीसीसीआय 'सी' श्रेणीतील खेळाडूंना दरवर्षी १ कोटी रुपये मानधन देते. 

भारताने नुकतीच इंग्लंडविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळली. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात म्हणजेच राजकोट कसोटीतून सरफराज आणि जुरेल यांनी भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या दोन्ही खेळाडूंनी त्या कसोटी मालिकेत चमकदार कामगिरी केली होती. 

विशेष म्हणजे, बीसीसीआयने आधीच स्पष्ट केले होते की जर कोणत्याही खेळाडूने निर्धारित वेळेत ३ कसोटी किंवा ८ एकदिवसीय किंवा १० टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले तर त्यांना 'सी' श्रेणीचा करार दिला जाईल. सर्फराज आणि जुरेल यांनी निर्धारित वेळेत प्रत्येकी तीन कसोटी सामने खेळले आहेत, त्यामुळे बीसीसीआयने त्यांना केंद्रीय करार दिला.

इंग्लंडविरुद्ध दोन्ही खेळाडूंनी दाखवला दम

सरफराज खान मुंबईसाठी प्रथम श्रेणी खेळतो. त्याने राजकोटमध्ये आपला पदार्पणचा सामना खेळताना दोन्ही डावात अनुक्रमे ६२ आणि ६८* धावा केल्या. मात्र, रांचीमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील कसोटीत सरफराज फ्लॉप ठरला. त्याला दोन्ही डावात केवळ १४ आणि ० धावा करता आल्या. पण त्यानंतर धरमशाला येथे खेळल्या गेलेल्या शेवटच्या कसोटीत सरफराजने एकमेव डावात ५७६ धावा केल्या.

तर ध्रुव जुरेलने पदार्पणाच्या कसोटीच्या एकमेव डावात ४६ धावा केल्या होत्या. यानंतर, रांची येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील त्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सामन्यात, त्याने ९० आणि ३९* धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली, ज्यासाठी त्याला 'प्लेअर ऑफ द मॅच' म्हणून सन्मानित करण्यात आले. त्यानंतर धरमशाला कसोटीत त्याला एकमेव डावात १५ धावा करता आल्या. 

Whats_app_banner