BCCI ने अचानक घेतला मोठा निर्णय, हे ३ खेळाडू कानपूर कसोटी खेळणार नाहीत, कारण काय? वाचा-sarfaraz jurel yash dayal removed from india squad 2nd test vs bangladesh they play irani cup mumbai vs rest of india ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  BCCI ने अचानक घेतला मोठा निर्णय, हे ३ खेळाडू कानपूर कसोटी खेळणार नाहीत, कारण काय? वाचा

BCCI ने अचानक घेतला मोठा निर्णय, हे ३ खेळाडू कानपूर कसोटी खेळणार नाहीत, कारण काय? वाचा

Sep 24, 2024 10:34 PM IST

भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना २७ सप्टेंबरपासून कानपूर येथे खेळवला जाणार आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मासह बहुतांश खेळाडू दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी कानपूरला पोहोचले असून त्यांच्या सुरक्षेसाठी विशेष काळजी घेतली जात आहे.

BCCI ने अचानक घेतला मोठा निर्णय, हे ३ खेळाडू कानपूर कसोटी खेळणार नाहीत, कारण काय? वाचा
BCCI ने अचानक घेतला मोठा निर्णय, हे ३ खेळाडू कानपूर कसोटी खेळणार नाहीत, कारण काय? वाचा (PTI)

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मंगळवारी (२४ सप्टेंबर) इराणी चषक २०२४ साठी मुंबई आणि शेष भारताच्या संघांची घोषणा केली. संघ जाहीर होताच यातील खेळाडू प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. कारण त्यात बांगलादेशविरुद्ध निवडलेल्या तीन खेळाडूंचा समावेश आहे. आता त्यांना इराणी चषकात खेळण्यास सांगितले आहे. दरम्यान, या ३ खेळाडूंना वगळल्याने बांगलादेशला दुसरी कसोटी जिंकणे सोपे होईल का?

भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना २७ सप्टेंबरपासून कानपूर येथे खेळवला जाणार आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मासह बहुतांश खेळाडू दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी कानपूरला पोहोचले असून त्यांच्या सुरक्षेसाठी विशेष काळजी घेतली जात आहे. पहिल्या सामन्यातील कामगिरी पाहिल्यानंतर दुसऱ्या कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल होण्याची शक्यता फारच कमी आहे.

हे ३ खेळाडू दुसरी कसोटी खेळणार नाहीत

सरफराज खान, ध्रुव जुरेल आणि यश दयाल अशी या तीन खेळाडूंची नावे आहेत. या तीन खेळाडूंना बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी १५ सदस्यीय संघातही सामील करण्यात आले होते परंतु त्यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही.

आता इराणी कपच्या जबाबदारीमुळे सरफराज खान, ध्रुव जुरेल आणि यश दयाल दुसऱ्या कसोटीलाही मुकणार आहेत. एकीकडे सरफराज खान मुंबई संघाकडून खेळणार आहे, तर दुसरीकडे ध्रुव जुरेल आणि यश दयाल यांना ‘रेस्ट ऑफ इंडिया’ संघात स्थान मिळाले आहे.

श्रेयस अय्यर, इशान किशनपासून शार्दुल ठाकूरपर्यंत भारतीय कसोटी संघात पुनरागमन करण्याची आशा आहे. हे सर्व खेळाडू इराणी चषकात चांगली कामगिरी करून पुढील मालिकेसाठी टीम इंडियामध्ये स्थान मिळवू शकतात.

इराणी चषकाबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या वेळी शेष भारताने सौराष्ट्रला १७५ धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत करून ट्रॉफी जिंकली होती.

Whats_app_banner
विभाग