Viral Video : बाबर बाबर करते रहिए… स्ट्राइक रेटवरून सरफराज अहमदनं उडवली बाबर आझमची खिल्ली, व्हिडीओ पाहा-sarfaraz ahmed troll babar azam on strike rate cricket pakistan champions one day cup 2024 stallions vs dolphins ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Viral Video : बाबर बाबर करते रहिए… स्ट्राइक रेटवरून सरफराज अहमदनं उडवली बाबर आझमची खिल्ली, व्हिडीओ पाहा

Viral Video : बाबर बाबर करते रहिए… स्ट्राइक रेटवरून सरफराज अहमदनं उडवली बाबर आझमची खिल्ली, व्हिडीओ पाहा

Sep 20, 2024 11:40 AM IST

बाबर आझमच्या खेळीदरम्यान, पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि विरोधी संघाचा विकेटकीपर सरफराज अहमद याने त्याची मजा घेतली. यावेळी सरफराज गमतीने म्हणाला, की गोलंदाजांनी बाबरला बाद करू नये आणि त्याला ४० व्या षटकापर्यंत क्रीजवर राहू द्यावे.

Viral Video : बाबर बाबर करते रहिए… स्ट्राइक रेटवरून सरफराज अहमदनं उडवली बाबर आझमची खिल्ली, व्हिडीओ पाहा
Viral Video : बाबर बाबर करते रहिए… स्ट्राइक रेटवरून सरफराज अहमदनं उडवली बाबर आझमची खिल्ली, व्हिडीओ पाहा

पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम हा एकदिवसीय क्रिकेटमधील त्याच्या क्लासिक इनिंग्ससाठी ओळखला जातो. पण आजच्या वेगवान क्रिकेटच्या युगात त्याची खेळण्याची शैली जुनी होत चालली आहे.

बाबरचा वनडेचा स्ट्राइक रेट ८८ आहे, जो ODI मध्ये प्रभावी मानला जात नाही, तर T20 फॉरमॅटमध्ये त्याचा स्ट्राइक रेट केवळ १२९ इतका आहे. अशा या संथ खेळामुळे तो अनेकदा टीकेचा धनी बनतो. तसेच, सामना गमावण्याचे कारणही ठरतो.

पाकिस्तान चॅम्पियन्स वनडे कप स्पर्धेतही असेच काहीसे पाहायला मिळाले. या स्पर्धेतील एका सामन्यात बाबर आझम याने पहिल्या काही षटकांमध्ये चांगली सुरुवात केली. पण नंतर खेळ जस जसा पुढे गेला, तस तसा बाबरचा स्ट्राइक रेट कमी होत गेला. एकेकाळी तो १० चेंडूत १३ धावांवर खेळत होता, पण पुढच्या २२ चेंडूत तो केवळ १० धावाच करू शकला, त्यामुळे त्याच्या संघावर दडपण आले.

बाबर आझमच्या खेळीदरम्यान, पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि विरोधी संघाचा विकेटकीपर सरफराज अहमद याने त्याची मजा घेतली. यावेळी सरफराज गमतीने म्हणाला, की गोलंदाजांनी बाबरला बाद करू नये आणि त्याला ४० व्या षटकापर्यंत क्रीजवर राहू द्यावे.

सरफराज म्हणाला, की “जल्दी नहीं है, जल्दी नहीं है. बस इनको बोलो बाबर बाबर करते रहिए, बाबर को ४० ओव्हर खिला देंगे.”

बाबर आझमसाठी २०२४ हे वर्ष खूप आव्हानात्मक आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याची कामगिरी निराशाजनक होती आणि त्यानंतर २०२४ च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडला होता.

बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतही त्याची फलंदाजी अतिशय वाईट होती, बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने ४ डावात केवळ ६४ धावा केल्या. परिणामी तो आयसीसी क्रमवारीतील टॉप-१० मधून बाहेर पडला.

Whats_app_banner