भारताच्या देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा रणजी ट्रॉफीला सुरुवात झाली आहे. ११ ऑक्टोबरपासून या स्पर्धेतील सामन्यांना सुरुवात झाली आहे. यामुळे टीम इंडियाकडून खेळण्याचे स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूंच्या स्वप्नांना बळ मिळाले आहे.
रणजी ट्रॉफीतील एक सामना हैदराबाद आणि गुजरात यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यातून ६ फूट ९ इंच म्हणजेच अंदाजे ७ फूट उंचीच्या निशांत सरनू याला पदार्पणाची संधी मिळाली आहे. निशांतने हैदराबादसाठी पदार्पण केले आहे.
निशांतच्या उंचीमुळे त्याची चांगलीच गोलंदाजी प्रभावी ठरते. तो चांगला बाऊन्स मिळवू शकतो. भारताच्या अंडर-१९ संघासाठी खेळलेल्या निशांतने आपल्या गोलंदाजीने खूप प्रभावित केले. मात्र, तो अंडर १९ विश्वचषकाच्या संघात स्थान मिळवू शकला नाही.
निशांतला क्रिकेटर बनायचे नव्हेत, त्याने केवळ वजन कमी करण्यासाठी हा खेळ खेळण्यास सुरुवात केली होती. २०२१ मध्ये त्याने वजन कमी करण्यासाठी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली.
इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना निशांत म्हणाला, "मी खूप लठ्ठ होतो. माझे वजन १०२ किलो होते. मी बॅडमिंटन खेळलो पण यश मिळालं नाही. मी टेनिसही खेळलो पण तरीही काही झालं नाही. यानंतर मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि त्यानंतर सगळं काही सुरू झालं. हे खूप लवकर होत आहे. मला आश्चर्य वाटते की खरोखर काय झाले? कारण मला वाटायचे की मी कधीही खेळाडू शकत नाही”
निशांतची उंची हीच त्याच्यासाठी एक्स फॅक्टर नाही. तर त्याची गोलंदाजी अॅक्शनही फलंदाजांना अडचणीत आणणारी आहे. तो सध्याचा महान गोलंदाज जसप्रीत बुमराहप्रमाणे गोलंदाजी करतो. बुमराहची कॉपी करताना त्याची अॅक्शनही बुमराहसारखी झाली.
तो म्हणाला, "मी बुमराहच्या अॅक्शनची कॉपी करायचो. जेव्हा तुम्ही प्रोफेशनल नसता तेव्हा तुम्ही तुमच्या आवडत्या गोलंदाजाची कॉपी करता. हे माझ्यासाठी सोपे शब्द नव्हते, पण मग मी का बदलू असा विचार केला.
गेल्या वर्षी एकदिवसीय विश्वचषकासाठी पाकिस्तानचा संघ भारतात आला तेव्हा हैदराबादमध्ये निशांत हा पाकिस्तान संघाचा नेट बॉलर होता. त्यावेळी मॉर्नी मॉर्केल पाकिस्तानचे गोलंदाजी प्रशिक्षक होते. निशांतला पाहून मॉर्केल खूप प्रभावित झाला.
तर या वर्षाच्या सुरुवातीला टीम इंडिया टेस्ट मॅचसाठी हैदराबादला आली होती आणि यावेळी निशांतने राहुल द्रविडला खूप प्रभावित केलं होतं. निशांत हा माजी भारतीय क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांच्या अकादमीत ट्रेनिंग घेतो.