भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा तिसरा सामना ब्रिस्बेनच्या गाबा क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. खेळाच्या पहिल्या दिवशी (१४ डिसेंबर) टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
खेळ वेळेवर सुरू झाला, मात्र पहिल्या तासातच पावसाने अडथळा आणल्याने खेळाडूंना पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक आले होते, मात्र पावसाने त्यांची मजा घालवली.
टीम इंडियाचा हा सामना पाहण्यासाठी माजी भारतीय क्रिकेटर सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा तेंडुलकरही स्टेडियममध्ये आली होती. पावसामुळे सामना होऊ न शकल्याने साराही निराश झाल्याचे पाहायला मिळाले.
टीम इंडियाला चिअर करण्यासाठी सारा तेंडुलकर स्टेडियममध्ये येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही सारा भारतीय संघाच्या सामन्यांदरम्यान अनेकदा स्टेडियममध्ये स्पॉट झाली आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील गाबा कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेला. पहिल्या दिवशी फक्त १३.२ षटके टाकता आली. यानंतर संततधार पावसामुळे लवकर लंचब्रेक करण्यात करण्यात आला.
लंच ब्रेकनंतरही पाऊस थांबला नाही. याचा परिणाम असा झाला की चहापानानंतर पंचांनी पहिल्या दिवसाचा खेळ संपल्याचे घोषित केले.
उस्मान ख्वाजा आणि नॅथन मॅकस्विनी यांनी पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात केली. पावसामुळे खेळ थांबेपर्यंत ऑस्ट्रेलियाने बिनबाद २८ धावा केल्या होत्या. अशा स्थितीत खेळाच्या दुसऱ्या दिवशी कोणताही अडथळा न येता खेळ होणे अपेक्षित आहे.
पहिल्या दिवशीचा खेळ वाया गेल्यानंतर सामन्याच्या वेळेत बदल करण्यात आली आहे. आता उर्वरित ४ दिवसांचा खेळ ठाराविक वेळेपेक्षा अर्धा तास लवकर सुरू करण्यात येणार आहे. म्हणजेच, आता दुसऱ्या दिवशीचा खेळ भारतीय वेळेनुसार पहाटे ५:१५ वाजता सुरू होणार आहे. सोबतच, आता एका दिवसात ९८ षटके टाकले जातील आणि आजच्या दिवसाची भरपाई केली जाईल.
संबंधित बातम्या