Sara Tendulkar : क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर गेल्या अनेक वर्षांपासून एक फाऊंडेशन चालवत आहे. सचिन तेंडुलकर फाऊंडेशन असे त्याचे नाव असून, त्याअंतर्गत गरीब मुलांना शिक्षण, आरोग्य आणि खेळाशी जोडण्याचे काम केले जाते. या फाऊंडेशनमध्ये आता त्याची मुलगी सारा तेंडुलकर हिच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सचिन तेंडुलकरने नुकतेच जाहीर केले की, सारा तेंडुलकर त्यांच्या या फाऊंडेशनमध्ये संचालक म्हणून सामील होत आहे. सारा तेंडुलकरने या फाऊंडेशनशी संबंधित कामांमध्येच पदव्युत्तर पदवी मिळवली आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा एकमेव फलंदाज सचिन तेंडुलकरने आपल्या सोशल मीडिया हँडल्सवर लिहिले की, ‘माझी मुलगी सारा तेंडुलकर एसटीएफमध्ये (सचिन तेंडुलकर फाऊंडेशन) संचालक म्हणून रुजू झाली आहे, हे सांगताना मला खूप आनंद होत आहे. तिने युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधून क्लिनिकल आणि पब्लिक हेल्थ न्यूट्रिशनमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे. क्रीडा, आरोग्य सेवा आणि शिक्षणाच्या माध्यमातून भारताला सक्षम करण्याच्या या प्रवासाला सुरुवात करताना जागतिक शिक्षण कसे पूर्ण पणे येऊ शकते, याची सगळी व्यवस्था आता ती बघणार आहे.’
या फाऊंडेशनच्या कार्यात सारा तेंडुलकर हिने या आधीही अनेकदा योगदान दिले आहे. आता तिचं शिक्षण पूर्ण झाल्याने तिच्या हाती संचालक पदाची धुरा देण्यात आली आहे. या फाऊंडेशनच्या पेजवर सारा तेंडुलकरचे सर्व फोटो पाहायला मिळतील. या फोटोंमध्ये सारा तिचे वडील सचिन तेंडुलकर, आई अंजली तेंडुलकर आणि भाऊ अर्जुन तेंडुलकरसोबत दिसली आहे. आता या फाऊंडेशनच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याची जबाबदारी तिच्या खांद्यावर आली आहे. सचिन तेंडुलकरने अनेक वर्षांपूर्वी या फाऊंडेशनची स्थापना केली असून, त्याने आतापर्यंत हजारो मुलांना मदत केली आहे. सचिन तेंडुलकरची पत्नी या फाऊंडेशनची सहसंस्थापक आणि संचालिका आहेत.
सारा तेंडुलकरने तिचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर या फाऊंडेशनच्या कार्यात अधिक सक्रियपणे सहभाग घेणे सुरू केले आहे. आता तिला या फाऊंडेशनचे संचालक पद देण्यात आले आहे, ज्यामुळे ती या संस्थेच्या निर्णय प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका पार पाडेल. तिच्या नेतृत्वाखाली, फाऊंडेशनच्या कार्यात आणखी विस्तार आणि प्रभावीपणा येऊ शकतो. सारा आणि तिचे कुटुंब फाऊंडेशनच्या विविध कार्यांमध्ये भाग घेत आहेत.
संबंधित बातम्या