Sanju Samson : संजूने आफ्रिकन चाहत्यांची मनं जिंकली, चेंडू लागलेल्या महिला फॅनची घेतली भेट, व्हिडीओ पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Sanju Samson : संजूने आफ्रिकन चाहत्यांची मनं जिंकली, चेंडू लागलेल्या महिला फॅनची घेतली भेट, व्हिडीओ पाहा

Sanju Samson : संजूने आफ्रिकन चाहत्यांची मनं जिंकली, चेंडू लागलेल्या महिला फॅनची घेतली भेट, व्हिडीओ पाहा

Nov 17, 2024 04:49 PM IST

Sanju Samson News In Marathi : भारताचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन याने ५६ चेंडूत १०९ धावांची तुफानी खेळी केली. पण त्याच्या एका षटकाराने स्टँडमध्ये बसलेल्या एका महिला चाहतीला जखमी केले.

Sanju Samson : संजूने आफ्रिकन चाहत्यांची मनं जिंकली, चेंडू लागलेल्या महिला फॅनची घेतली भेट, व्हिडीओ पाहा
Sanju Samson : संजूने आफ्रिकन चाहत्यांची मनं जिंकली, चेंडू लागलेल्या महिला फॅनची घेतली भेट, व्हिडीओ पाहा

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा टी-20 सामना शुक्रवारी (१५ नोव्हेंबर) जोहान्सबर्गच्या वांडरर्स स्टेडियमवर खेळला गेला. स्फोटक फलंदाजीच्या जोरावर भारताने सामना सहज जिंकला. पण या सामन्यात भारताच्या फलंदाजीदरम्यान एक वाईट घटना घडली.

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन याने ५६ चेंडूत १०९ धावांची तुफानी खेळी केली. पण त्याच्या एका षटकाराने स्टँडमध्ये बसलेल्या एका महिला चाहतीला जखमी केले.

महिला चाहती रडायला लागली

ही घटना भारताच्या डावाच्या १०व्या षटकात घडली. जेव्हा सॅमसनने डीप मिड-विकेटवर दमदार शॉट मारला. दुर्दैवाने चेंडू थेट महिलेच्या चेहऱ्यावर आदळला. यानंतर ती वेदनेने रडताना दिसली.

दरम्यान, संजूने षटकार मारल्यानंतर चेंडू महिला फॅनच्या दिशेने जात नव्हता. पण जेव्हा चेंडूचा टप्पा पडल्यानंतर तो टर्न झाला आणि थेट महिलेच्या गालावर जाऊन लागला. चेंडू जोरात लागल्याने महिलेच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. याचे फोटोही सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले.

महिलेला चेंडू लागल्यानंतर फलंदाजी करत असलेल्या संजू सॅमसनच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव स्पष्ट दिसत होते. त्याने मैदानातून हात दाखवत माफीही मागितली.

सामना संपल्यानंतर संजूने महिला फॅनची भेट घेतली

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यानंतर संजूने सॅमसनने स्टेडियमवरच जखमी महिला चाहतीची भेट घेतली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये संजूला अनेक चाहत्यांनी घेरले आहे. यामध्ये तो एका महिला चाहतीसोबत उभा राहून बोलत आहे. यावेळी महिलेच्या चेहऱ्यावर प्रसन्न भाव दिसत आहेत.

या सामन्यात संजू सॅमसनने शतक झळकावले. मालिकेतील ४ सामन्यांत तो दोनदा शून्यावर बाद झाला होता, तर उर्वरित दोन डावांत शतक झळकावले.

भारताने मालिकाही जिंकली

भारताने टी-20 मालिकेतील शेवटचा सामना १३५ धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने २८३ धावा केल्या. संजू व्यतिरिक्त तिलक वर्माने १२० धावांची खेळी केली. दक्षिण आफ्रिकेचा डाव केवळ १४८ धावांवरच आटोपला. या विजयासह भारताने ४ टी-20 सामन्यांची मालिका ३-१ अशी जिंकली.

Whats_app_banner