Sanju Samson : संजू सॅमसनची पत्नी जाम खूश, पतीच्या फलंदाजीवर पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Sanju Samson : संजू सॅमसनची पत्नी जाम खूश, पतीच्या फलंदाजीवर पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

Sanju Samson : संजू सॅमसनची पत्नी जाम खूश, पतीच्या फलंदाजीवर पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

Nov 09, 2024 03:02 PM IST

Sanju Samson Wife Charulatha Remesh Insta Story : संजू सॅमसनने आपल्या खेळीत ७ चौकार आणि १० षटकार मारले. या शानदार कामगिरीसाठी संजू सॅमसनला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

Sanju Samson : संजू सॅमसनची पत्नी जाम खूश, पतीच्या फलंदाजीवर पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया
Sanju Samson : संजू सॅमसनची पत्नी जाम खूश, पतीच्या फलंदाजीवर पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

भारतीय क्रिकेट संघाने पहिल्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सहज पराभव केला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने ६१ धावांनी विजय मिळवला. भारताच्या या विजयाचा हिरो यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन ठरला. संजू सॅमसनने ५० चेंडूत १०७ धावांची जबरदस्त खेळी केली.

संजू सॅमसनने आपल्या खेळीत ७ चौकार आणि १० षटकार मारले. या शानदार कामगिरीसाठी संजू सॅमसनला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

याआधी संजू सॅमसनने बांगलादेशविरुद्धही शतक झळकावले होते. अशाप्रकारे, सलग २ टी-20 सामन्यात शतके झळकावणाऱ्या खेळाडूंच्या विशेष यादीत संजू सॅमसनचा समावेश झाला आहे. तसेच, संजू सलग दोन टी-20 शतके ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.

माझा आवडता हिरो...'

संजू सॅमसनच्या या शतकावर पत्नी चारुलता रमेश हिने इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट केली आहे. या फोटोमध्ये संजू सॅमसन सुपरहिरोच्या रुपात दाखवण्यात आला आहे. त्याचवेळी चारुलता रमेश हिने कॅप्शनमध्ये लिहिले, माय फॉरएव्हर फेव्हरेट हीरो... असे लिहिले आहे.

आता चारुलता रमेशची इन्स्टाग्राम स्टोरी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स सतत कमेंट करून आपला फीडबॅक देत आहेत.

Sanju Samson Wife Charulatha Remesh Insta Story
Sanju Samson Wife Charulatha Remesh Insta Story

भारत-आफ्रिका पहिल्या टी-20 मध्ये काय घडलं?

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ४ टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना डरबनमध्ये खेळला गेला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने २० षटकांत ८ गडी गमावून २०२ धावा केल्या. भारताकडून संजू सॅमसनने ५० चेंडूत १०७ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ७ चौकार आणि १० षटकार मारले.

याशिवाय तिलक वर्माने १८ चेंडूत ३३ धावांचे योगदान दिले. भारताच्या २०२ धावांना प्रत्युत्तर देताना फलंदाजीला आलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ १७.५ षटकात १४१ धावांवर सर्वबाद झाला. अशा प्रकारे भारताने हा सामना ६१ धावांनी जिंकला. भारताकडून वरुण चक्रवर्ती आणि रवी बिश्नोई यांनी सर्वाधिक ३-३ बळी घेतले. याशिवाय आवेश खानला २ विकेट मिळाले. अर्शदीप सिंगने १ बळी घेतला.

Whats_app_banner