IND vs SA : आफ्रिकेचा मार्को यान्सेन भर मैदानात संजू सॅमसनला भिडला, मग कॅप्टन सूर्याने दाखवला इंगा, पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs SA : आफ्रिकेचा मार्को यान्सेन भर मैदानात संजू सॅमसनला भिडला, मग कॅप्टन सूर्याने दाखवला इंगा, पाहा

IND vs SA : आफ्रिकेचा मार्को यान्सेन भर मैदानात संजू सॅमसनला भिडला, मग कॅप्टन सूर्याने दाखवला इंगा, पाहा

Nov 09, 2024 11:53 AM IST

Suryakumar Yadav Marco Jansen Fight : जेव्हा आपल्या संघाचा पराभव होताना दिसले, तेव्हा यान्सेनने मैदानावर विचित्र गोष्टी करायला सुरुवात केली. पण यानंतर संजू सॅमसनने कर्णधार सूर्यकुमार यादवकडे याची तक्रार केली.

IND vs SA : आफ्रिकेचा मार्को यान्सेन भर मैदानात संजू सॅमसनला भिडला, मग कॅप्टन सूर्याने दाखवला इंगा, पाहा
IND vs SA : आफ्रिकेचा मार्को यान्सेन भर मैदानात संजू सॅमसनला भिडला, मग कॅप्टन सूर्याने दाखवला इंगा, पाहा

संजू सॅमसनच्या झंझावाती शतकाच्या जोरावर टीम इंडियाने पहिल्या टी-20 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा ६१ धावांनी पराभव केला. ४ टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने प्रथम खेळून ८ विकेट गमावत २०२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात यजमान दक्षिण आफ्रिकेचा संघ १४१ धावांत गारद झाला. भारताच्या विजयाचा हिरो ठरला यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसन.

दरम्यान या सामन्यात शांत स्वभावाच्या संजू सॅमसनचे आणि आफ्रिकेचा ऑलराऊंडर मार्को यान्सेन यांच्यात बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले.

वास्तविक, जेव्हा आपल्या संघाचा पराभव होताना दिसले, तेव्हा यान्सेनने मैदानावर विचित्र गोष्टी करायला सुरुवात केली. पण यानंतर संजू सॅमसनने कर्णधार सूर्यकुमार यादवकडे याची तक्रार केली. यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने पुढाकार घेतला आणि यान्सेनला प्रत्युत्तर द्यायला विलंब केला नाही.

हे सर्व प्रकरण आफ्रिकेच्या डावातील १५व्या षटकाचा तिसरा चेंडू टाकण्यापूर्वी घडले. संजू सॅमसन चेंडू पकडत असताना, मार्को यानसेन सतत संजूला काहीतरी बोलत होता. यानंतर संजूने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, पण तो ऐकण्याचे नाव घेत नव्हता. यानंतर सॅमसनने सूर्यकुमार यादवकडे याची तक्रार केली. सूर्याने मैदानावरील पंच लुबाबालो गाकुमा आणि स्टीफन हॅरिस यांच्यासमोर आपले मत व्यक्त केले.

मार्को यानसेनला कदाचित हे फारसे आवडले नाही. संभाषणादरम्यान, चेहऱ्यावरील हावभावांवरून स्पष्ट दिसत होते, की सूर्या चांगलाच चिडलेला होता. काहीवेळ चर्चेनंतर प्रकरण शांत झाले.

या सामन्यात, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने प्रोटीज विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात नेत्रदीपक विजय नोंदवला आणि चार सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करताना संजू सॅमसनच्या १०७ धावांच्या झंझावाती खेळीमुळे भारताने २० षटकांत ८ गडी गमावून २०२ धावा केल्या. सॅमसनचे हे सलग दुसरे शतक ठरले. यासह २९ वर्षीय सॅमसन सलग दोन टी-20 शतके झळकावणारा पहिला भारतीय ठरला.

प्रत्युत्तरात फलंदाजीला आलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ वरुण चक्रवर्ती आणि रवी बिश्नोई (प्रत्येकी ३ विकेट) यांच्या मारेकऱ्या गोलंदाजीमुळे १८ षटकांत १४१ धावांत गडगडला. पाहुण्या संघाने हा सामना ६१ धावांनी जिंकला.

Whats_app_banner