संजू सॅमसननं मारलेला चेंडू तरुणीच्या गालावर लागला, चेट्टानं चालू सामन्यात माफी मागितली
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  संजू सॅमसननं मारलेला चेंडू तरुणीच्या गालावर लागला, चेट्टानं चालू सामन्यात माफी मागितली

संजू सॅमसननं मारलेला चेंडू तरुणीच्या गालावर लागला, चेट्टानं चालू सामन्यात माफी मागितली

Nov 16, 2024 12:16 PM IST

Sanju Samsonजोहान्सबर्ग येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या T20 सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा १३५ धावांनी पराभव करत मालिका ३-१ ने जिंकली. या सामन्यात संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांनी शतके झळकावली. सॅमसनने ५६ चेंडूत नाबाद १०९ धावा केल्या, तर टिळक वर्माने ४७ चेंडूत नाबाद १२० धावा केल्या.

Sanju Samson : संजूचा मारलेला चेंडू तरुणीच्या गालावर आदळला, चालू सामन्यात माफी मागितली
Sanju Samson : संजूचा मारलेला चेंडू तरुणीच्या गालावर आदळला, चालू सामन्यात माफी मागितली

टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसन याला T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शतकं झळकावण्याची सवय लागली आहे. त्याने गेल्या ५ डावांत तीन शतके झळकावली आहेत. संजूने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील चौथ्या सामन्यातही शतक झळकावले. पण या सामन्यात संजू सॅमसनने एक असा षटकार मारला की चेंडू प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका मुलीच्या चेहऱ्यावर लागला.

क्रिकेटचा चेंडू अतिशय टणक असतो, तोच त्या महिलेच्या चेहऱ्यावर आदळला, अशा स्थितित चाहतीला किती वेदना झाल्या असतील याची कल्पनाच करता येईल.

संजू सॅमसनने डावाच्या १०व्या षटकातील पहिल्या चेंडूवर षटकार मारून आपले अर्धशतक पूर्ण केले. ट्रिस्टन स्टब्स गोलंदाजी करत होता, दुसरीकडे अर्धशतक पूर्ण केल्यानंतर पुढच्या चेंडूवर सॅमसनने आणखी षटकार मारला. पण चेंडू थेट मुलीच्या गालावर लागला. 

चेंडू मुलीला लागल्याचे दिसताच कॅमेरा सॅमसनकडे वळला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरही काळजीचे भाव दिसत होते. संजूने लगेच मुलीच्या दिशेने हात दाखवत तिची माफी मागितली. 

या महिला क्रिकेट फॅनचा रडण्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारतीय यष्टीरक्षक फलंदाजाने महिलेला स्वाक्षरी केलेली बॅट भेट देऊन उदारतेचे उदाहरण ठेवावे, अशी मागणी अनेकजण करत आहेत.

दुसरीकडे, मॅच लाईव्ह पाहताना फोनवर चॅटिंग करणं ही चांगली गोष्ट नाही, असं म्हणत एका चाहत्याने मुलीला ट्रोल केलं.

भारताचा तिसरा सर्वात मोठा विजय

भारतीय संघाने चौथ्या T20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा १३५ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये टीम इंडियाचा हा तिसरा सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी भारताने आयर्लंडचा १४३ धावांनी तर न्यूझीलंडचा १६८ धावांनी पराभव केला होता.

सूर्यकुमार यादवने त्याच्या नेतृत्वाखाली मालिका जिंकण्याची हॅट्ट्रिक केली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने श्रीलंका आणि बांगलादेशचा ३-० असा पराभव केला. आता दक्षिण आफ्रिकेचा ३-१ असा पराभव करण्यात यश आले आहे.

Whats_app_banner