Sanju Samson : अवघ्या ७ सामन्यात संजूने वातावरण फिरवलं, रोहित-सूर्या सगळ्यांनाच मागे टाकलं, हे खास रेकॉर्ड पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Sanju Samson : अवघ्या ७ सामन्यात संजूने वातावरण फिरवलं, रोहित-सूर्या सगळ्यांनाच मागे टाकलं, हे खास रेकॉर्ड पाहा

Sanju Samson : अवघ्या ७ सामन्यात संजूने वातावरण फिरवलं, रोहित-सूर्या सगळ्यांनाच मागे टाकलं, हे खास रेकॉर्ड पाहा

Nov 18, 2024 09:26 PM IST

Sanju Samson Records In T20 : भारतीय संघाने टी-20 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अप्रतिम कामगिरी करत वर्षाचा शेवट केला आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेत जाऊन टी-20 मालिका जिंकण्यात यश मिळविले.

Sanju Samson : अवघ्या ७ सामन्यात संजूने वातावरण फिरवलं, रोहित-सूर्या सगळ्यांनाच मागे टाकलं, हे खास रेकॉर्ड पाहा
Sanju Samson : अवघ्या ७ सामन्यात संजूने वातावरण फिरवलं, रोहित-सूर्या सगळ्यांनाच मागे टाकलं, हे खास रेकॉर्ड पाहा (PTI)

टीम इंडियाचे यावर्षीचे वनडे आणि टी-20 चे सर्व सामने पूर्ण झाले आहेत. आाता टीम इंडिया उरलेल्या दोन महिन्यात केवळ कसोटी क्रिकेट खेळणार आहे. कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया ऑस्ट्रेलियात आहे.

दरम्यान, भारतीय संघाने टी-20 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अप्रतिम कामगिरी करत वर्षाचा शेवट केला आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेत जाऊन टी-20 मालिका जिंकण्यात यश मिळविले.

या मालिकेदरम्यान तिलक वर्माने सलग दोन शतके झळकावली. पण या मालिकेत सर्वाधिक चर्चा झाली ती संजू सॅमसन याची. संजूला काही दिवसांपूर्वी संघात स्थानही मिळत नव्हते, पण त्याने आता चमत्कार करून दाखवला आहे. संजू बांगलादेशविरुद्धचे तीन आणि आफ्रिकेविरुद्धचे ४ सामने खेळले. अशा प्रकारे त्याने अवघ्या ७ सामन्यात स्वताला सिद्ध करून दाखवले आहे.

संजूने २०२४ वर्षात भारताकडून सर्वाधिक टी-20 धावा केल्या

संजू सॅमसन हा या वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये भारतासाठी सर्वाधिक टी-२० आंतरराष्ट्रीय धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने स्वतःचा कर्णधार आणि सध्या ICC T20 क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेला फलंदाज सूर्यकुमार यादवलाही मागे टाकले आहे. या यादीत रोहित शर्माचेही नाव आहे.

षटकार मारण्याच्या बाबतीतही संजू नंबर वन

संजू सॅमसनने २०२४ मध्ये १३ सामन्यांच्या १२ डावांमध्ये ४३६ धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने ३ शतके आणि १ अर्धशतक झळकावले आहे. विशेष म्हणजे तो या वर्षात ५ वेळा शून्यावरही आऊट झाला आहे. या वर्षी सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीतही तो अव्वल ठरला आहे. २०२४ मध्ये त्याच्या नावावर एकूण ३१ षटकार आहेत.

सूर्या दुसऱ्या तर रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर

यानंतर सूर्यकुमार यादव यांचे नाव येते. ज्याने यावर्षी १८ सामन्यांच्या १७ डावात ४२९ धावा केल्या आहेत. या वर्षात त्याच्या नावावर एकही शतक नाही, मात्र ४ अर्धशतकं झळकावण्यात तो नक्कीच यशस्वी झाला आहे. रोहित शर्माबद्दल बोलायचे झाले तर तो या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ११ सामने खेळून ३७८ धावा केल्या आहेत. त्याने यावर्षी टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात एक शतक आणि ३ अर्धशतके झळकावली आहेत.

या मालिकेपर्यंत संजू सॅमसनची टीम इंडियातील जागा निश्चित झाली नव्हती. मात्र शतकांमागून शतके ठोकत तो आता आपले स्थान पक्के करण्यात यशस्वी झाला आहे. भारतीय संघ पुढील वर्षी टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी मैदानात उतरतो तेव्हा संजू सॅमसन कशी कामगिरी करतो हे पाहणे बाकी आहे. २०२६ मध्ये टी-20 विश्वचषकही आहे, त्यामुळे पुढील वर्षाचा काळ त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा असेल.

Whats_app_banner