मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Sanju Samson : टीम इंडियात पूर्ण राजकारण… संजू सॅमसनचे फॅन्स त्याच्यासाठी पुन्हा मैदानात, पाहा

Sanju Samson : टीम इंडियात पूर्ण राजकारण… संजू सॅमसनचे फॅन्स त्याच्यासाठी पुन्हा मैदानात, पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 11, 2024 09:30 PM IST

Sanju Samson Fans On Social Media : रोहित शर्माने पहिल्या सामन्यात संजू सॅमसन आणि यशस्वी जैस्वाल यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली नाही. यानंतर संजू सॅमसनचे फॅन्स मैदानात आले आहेत.

Sanju Samson Fans
Sanju Samson Fans (PTI)

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात झाली. या मालिकेतील पहिला सामना मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

रोहित शर्माने पहिल्या सामन्यात संजू सॅमसन आणि यशस्वी जैस्वाल यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली नाही. जैस्वालला दुखापतीमुळे पहिल्या T20 मध्ये टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकले नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने जैस्वाल याच्याबाबत अपडेट दिले आहे.

पण, संजू सॅमसन प्लेइंग इलेव्हनमध्ये का नाही, याची माहिती समोर आलेली नाही. सीनीयर खेळाडूंच्या अनुपस्थितीत संजूला सामना खेळवण्याची चांगली संधी होती, पण मॅनेजमेंटला संजू सॅमसनला पुन्हा बँचवर बसवले. संजूच्या जागी जितेश शर्मा विकेटकीपर फलंदाज म्हणून खेळत आहे.

यानंतर आता संजू सॅमसनचे फॅन्स पुन्हा एका त्याच्यासाठी मैदानात उतरले आहेत. त्याचे चाहते त्याच्यासाठी नेहमीच तयार असतात. आता सोशल मीडियावर संजू सॅमसन फॅन्सनी गोंधळा घालायला सुरुवात केली आहे. टीम इंडियात संजू सॅमसनबाबत राजकारण सुरू असल्याचे आरोप त्याच्या चाहत्यांनी केले आहेत.

दरम्यान, आजच्या सामन्यात यशस्वी जैस्वाल आणि कुलदीप यादवलाही स्थान मिळालेले नाही. पण सोशल मीडियावर सॅमसनबाबत प्रतिक्रियांचा पूर आला आहे.

अफगाणिस्तानच्या १५८ धावा

या सामन्यात अफगाणिस्तान प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १५८ धावा केल्या. आता भारतला विजयासाठी १५९ धावा करायच्या आहेत.

अफगाणिस्तान संघाकडून मोहम्मद नबीने सर्वाधिक ४२ धावांची खेळी केली. तर अजमतुल्ला उमरझाईने २९ धावा केल्या. या सामन्यात नबी आणि ओमरझाई यांनी चौथ्या विकेटसाठी ४३ चेंडूत ६८ धावांची भागीदारी केली.

या दोन फलंदाजांशिवाय गुरबाजने २३ आणि कर्णधार झाद्रानने २९ धावा केल्या. नजीबुल्लाह झादरानने अखेरीस ११ चेंडूत १९ धावांची इनिंग खेळली.

भारताकडून अक्षर पटेल आणि मुकेश कुमार यांनी २-२ विकेट घेतल्या. शिवम दुबेने एक विकेट मिळविला.

WhatsApp channel