संजू सॅमसनने जोहान्सबर्गमध्ये धमाकेदार कामगिरी केली आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतील चौथ्या सामन्यात शतक झळकावले. या खेळीदरम्यान सॅमसनने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची तुफान धलाई केली.
संजूच्या शतकाच्या जोरावर भारताने अवघ्या १५ षटकांत २०० धावांचा टप्पा पार केला. त्याच्यासोबतच तिलक वर्मानेही गोलंदाजांची अवस्था बिकट केली. सॅमसनचे टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे तिसरे शतक आहे.
सॅमसनने रोहित शर्माच्या एका खास विक्रमाची बरोबरी केली आहे. T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक ८ किंवा अधिक षटकार मारण्याच्या बाबतीत त्याने रोहितची बरोबरी केली आहे. रोहितने हा पराक्रम तीनदा केला आहे. संजूने जोहान्सबर्गमध्येही हा पराक्रम करून दाखवला आहे. या यादीत सूर्यकुमार यादव दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने दोनदा ८ षटकार मारले आहेत.
सॅमसनने केएल राहुल आणि इशान किशनचा रेकॉर्ड मोडला आहे. सॅमसन हा भारतासाठी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतके झळकावणारा यष्टीरक्षक फलंदाज बनला आहे. त्याने ४ अर्धशतके केली आहेत. तर इशान आणि राहुलने ३-३ अर्धशतके केली आहेत.
भारताची प्लेइंग इलेव्हन: संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती.
दक्षिण आफ्रिकेची प्लेइंग इलेव्हन: रायन रिकेल्टन, रीझा हेन्ड्रिक्स, एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, मार्को जॉन्सन, गेराल्ड कोएत्झी, अँडिले सिमेलेन, केशव महाराज, लुथो सिपामला.