संजू सॅमसनच्या चाहत्यांचा ट्वीटवर धिंगाणा, शुभमनला कर्णधार बनवल्यानंतर BCCI विरुद्ध संतापाचा भडका
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  संजू सॅमसनच्या चाहत्यांचा ट्वीटवर धिंगाणा, शुभमनला कर्णधार बनवल्यानंतर BCCI विरुद्ध संतापाचा भडका

संजू सॅमसनच्या चाहत्यांचा ट्वीटवर धिंगाणा, शुभमनला कर्णधार बनवल्यानंतर BCCI विरुद्ध संतापाचा भडका

Jun 24, 2024 08:11 PM IST

Sanju Samson Fans Angry on BCCI : संजू सॅमसन हा शुभमन गिलपेक्षा अनुभवाने वरिष्ठ खेळाडू आहे. अशा परिस्थितीत संजू सॅमसन संघात असताना गिलकडे टीम इंडियाचे नेतृत्व देणे, क्रिकेट चाहत्यांना आवडलेले दिसत नाही.

संजू सॅमसनच्या चाहत्यांचा ट्वीटवर धिंगाणा, शुभमनला कर्णधार बनवल्यानंतर BCCI विरुद्ध संतापाचा भडका
संजू सॅमसनच्या चाहत्यांचा ट्वीटवर धिंगाणा, शुभमनला कर्णधार बनवल्यानंतर BCCI विरुद्ध संतापाचा भडका

Team India Squad For Zimbabwe Tour : बीसीसीआयने आज सोमवारी (२४ जून) झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या दौऱ्यासाठी एकमेव वरिष्ठ खेळाडूची निवड करण्यात आली आहे. तर बाकी सर्व वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी शुभमन गिलकडे कर्णधारपद देण्यात आले आहे. तर या दौऱ्यासाठी पहिल्यांदाच नितीश कुमार रेड्डी, अभिषेक शर्मा, रियान पराग आणि तुषार देशपांडे यांचा टीम इंडियात समावेश करण्यात आला आहे. हे सर्व खेळाडू प्रथमच भारतीय संघात सामील झाले आहेत.

वरिष्ठ खेळाडू संजू सॅमसनचा विकेटकीपर फलंदाज म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. या निवडीवर संजू सॅमनचे फॅन्स चांगलेच संतापले आहेत.

वास्तविक, संजू सॅमसन हा शुभमन गिलपेक्षा अनुभवाने वरिष्ठ खेळाडू आहे. अशा परिस्थितीत संजू सॅमसन संघात असताना गिलकडे टीम इंडियाचे नेतृत्व देणे, क्रिकेट चाहत्यांना आवडलेले दिसत नाही. संजू सॅमसनचे चाहते ट्वीटवर बीसीसीआयविरुद्ध संताप व्यक्त करत आहेत.

सोबतच चाहत्यांच्या मते, संजू सॅमसन २०२१ पासून आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व करत आहे. संजूने त्याच्या नेतृत्वात संघाला एकदा फायनलमध्ये तर एकदा प्लेऑफमध्ये नेले आहे. शिवाय शुभमन गिलने केवळ आयपीएल २०२४ मध्येच गुजरात टायटन्सचे कर्णधारपद भुषवले आहे. त्या मोसमात गुजरातची कामगिरी अतिशय खराब झाली होती. तर संजूच्या नेतृत्वातील राजस्थान प्लेऑफमध्ये पोहोचली होती.

हे खेळाडू पहिल्यांदाच टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार

या दौऱ्यातील ५ खेळाडूंची पहिल्यांदाच टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात निवड झाली आहे. यात अभिषेक शर्मा, तुषार देशपांडे, ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, रियान पराग यांचा समावेश आहे.

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया - शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), नितीश रेड्डी, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान , खलील अहमद, मुकेश कुमार आणि तुषार देशपांडे.

Whats_app_banner