भारताचा स्टार खेळाडू संजू सॅमसन आज त्याचा ३० वा वाढदिवस साजरा करत आहे. संजू सॅमसनचा जन्म ११ नोव्हेंबर १९९४ रोजी झाला. संजूचा जन्म केरळमधील तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील पुलुविल गावात झाला. भारतीय संघाव्यतिरिक्त संजू सॅमसन आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळतो. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो केरळकडून खेळतो.
संजू सॅमसनने सलग दोन टी-20 सामन्यात दोन शतके झळकावून इतिहास रचला. सलग दोन T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शतके झळकावणारा संजू सॅमसन पहिला भारतीय खेळाडू ठरला. तर तो जगातील चौथा फलंदाज ठरला आहे. ज्याने दोन सामन्यात दोन शतके झळकावली आहेत.
संजू सॅमसन २०१४ च्या आयपीएल दरम्यान चर्चेत आला जेव्हा त्याला राजस्थान रॉयल्स संघाने ४ कोटी रुपयांना विकत घेतले. संजू तेव्हा लिलावात करोडपती बनणारा सर्वात युवा भारतीय क्रिकेटपटू होता. याआधी २०१३ मध्ये तो चॅम्पियन्स लीग T20 मध्ये दिसला होता.
मुंबई इंडियन्सविरुद्ध पदार्पण करताना त्याने यष्टिरक्षक म्हणून सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा आणि किरॉन पोलार्ड यांचे झेल घेतले. तो फलंदाजीला आला तेव्हा त्याने ४७ चेंडूत ५४ धावा केल्या.
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात ज्यावेळी दुर्दैवी खेळाडूंची गाथा लिहिली जाईल, तेव्हा संजू सॅमसनचे नाव अग्रस्थानी येईल. नॅच्युरल स्ट्रोक प्लेयर आणि प्रतिभेचा धनी असलेल्या संजू सॅमसनला प्रत्येक वेळी नशीबाने दगा दिला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात अनलकी क्रिकेटर कोण? असा प्रश्न उपस्थित झाला तर सर्वात आधी संजू सॅमसनचे घेतले जाईल.
संजू सॅमसन गेल्या काही वर्षांपासून टीम इंडियाचा भाग आहे, पण त्याला कधीच सातत्यपूर्ण संधी मिळाली नाही. स्क्वाडमध्ये जागा मिळाली तर तो सलग सामन्यांमध्ये प्लेइंग इलेव्हनचा भाग नसतो.
संजूचे नाव आतापर्यंत दोन आशिया कप, दोन टी-20 वर्ल्डकप आणि २०२३ च्या वनडे वर्ल्डकपसाठी आघाडीवर होते. पण प्रत्येकवेळी त्याला संघातून वगळले जाते. २०२१ टी-20 वर्ल्डकपमध्ये दीपक हुडाने त्याची जागा घेतली. तर २०२२ च्या टी-20 वर्ल्डकपमध्ये दिनेश कार्तिकला संधी देण्यात आली. तर आशिया कप २०२३ साठी तिलक वर्मा आणि इशान किशनला संजूचे स्थान देण्यात आले. २०२४ च्या टी-20 वर्ल्डकप संघात जागा मिळाली पण एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.
संजूचा जन्म तिरुअनंतपुरम जिल्ह्यातील विझिंजम जवळील पुल्लुविला या किनारपट्टीवरील गावात झाला. संजू जेव्हा त्याचे शॉट्स खेळतो तेव्हा ते खूपच सहज वाटतात. जणू त्याला एवढे लांबलचक षटकार मारण्यासाठी विशेष काहीही प्रयत्न करावे लागले नाहीत.
लांब फटके सहज मारण्यात पटाईत असलेल्या संजूला २०१३ मध्ये पहिल्यांदा आयपीएल खेळण्याची संधी मिळाली. राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्याने त्या सीझनच्या ११ सामन्यात एकूण २०६ धावा केल्या.
आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात अर्धशतक झळकावण्याचा विक्रम संजू सॅमसनच्या नावावर होता. त्याच्या सुरुवातीच्या हंगामात वयाच्या १८ वर्षे आणि १६९ दिवसांचा असताना त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) विरुद्ध ४१ चेंडूत ६३ धावा केल्या. यानंतर रियान परागने वयाच्या १७ व्या वर्षी आयपीएलमध्ये अर्धशतक ठोकून विक्रम मोडला.
राजस्थानपाठोपाठ संजूनेही दिल्ली डेअरडेव्हिल्ससाठीही (Delhi capitls) आपली ताकद दाखवली. आता तो राजस्थान रॉयल्सचा कर्णधार आहे.
संजू सॅमसनचे वडील दिल्ली पोलिसात कॉन्स्टेबल होते, पण आपल्या मुलाला क्रिकेटर बनवण्यासाठी त्यांनी व्हीआरएस (स्वैच्छिक निवृत्ती) घेतली. खरंतर, संजू त्याच्या वडिलांसोबत दिल्लीत राहत होता, पण जेव्हा त्याची दिल्ली अंडर-१३ टीममध्ये निवड झाली नाही, तेव्हा त्याचे वडील आपल्या कुटुंबासह तिरुअनंतपुरमला परतले. हा संजू सॅमसनच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरला.
आज संजूची फॅन फॉलोइंग थक्क करणारी आहे. त्याचे चाहते सोशल मीडियापासून जगातील प्रत्येक क्रिकेट खेळणाऱ्या देशापर्यंत पसरलेले आहेत. जेव्हा संजूची संघात निवड होत नाही तेव्हा त्याचे चाहते प्रचंड नाराज होतात.
संजू सॅमसनने २०१५ मध्ये भारतीय संघाकडून T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून त्याने ३४ टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये संघासाठी ७०१ धावा केल्या आहेत.
यामध्ये दोन शतके आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. या कालावधीत त्याची सर्वोच्च धावसंख्या १११ धावांची आहे. त्याचबरोबर तो १६ एकदिवसीय सामनेही खेळत आहे. एकूण टी-20 क्रिकेटवर नजर टाकली तर संजूच्या नावावर ७०४८ धावा आहेत.