Sanju Samson And Abhishek Nayar Sings Song : भारतीय संघाला २२वफेब्रुवारीपासून इंग्लंडविरुद्ध पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. या मालिकेतील पहिला सामना कोलकाता येथील ईडन गार्डन येथे होणार आहे. टीम इंडिया मालिकेच्या पहिल्या सामन्यासाठी जोरदार तयारी करत आह
या दरम्यान, संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन आणि सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत दोघेही गाणे गाताना दिसत आहेत.
संजू आणि प्रशिक्षक अभिषेक नायरचे हे गाणे ऐकल्यानंतर सूर्या म्हणाला, की आप मुंबई आ रहे हैं… लेकीन, सूर्याने पुढे गंमतीत एक मजेशीर अट घातली. स्वतः संजू सॅमसनने हा व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.
व्हिडिओमध्ये संजू सॅमसन आणि अभिषेक नायर एक जबरदस्त गाणे गाताना दिसत आहेत. संजू आणि अभिषेक 'उडता ही फिरून इन हवाओं में कहीं' हे गाणे गायले. व्हिडिओला कॅप्शन देत संजूने लिहिले की, "काहीही अशक्य नाही." तसेच, पुढे "मैं मुंबई आ सकता हूं?’ असा प्रश्नही विचारला.
संजूच्या प्रश्नाला उत्तर देताना, इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारताची धुरा सांभाळणारा सूर्यकुमार यादव म्हणाला, "तू मुंबईला येऊ शकतोस पण चेन्नई, राजकोट, पुण्यात ऑडिशन घेतल्यानंतर."
टीम इंडियाला दुसरा टी-20 चेन्नईत, तिसरा राजकोट आणि चौथा पुण्यात खेळायचा आहे. त्यानंतर मालिकेतील शेवटचा टी-२० सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाईल. मालिका डोळ्यासमोर ठेवून सूर्याने हे उत्तर दिले.
इंग्लंडविरुद्धच्या या ५ टी-20 सामन्यांच्या मालिकेनंतर भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.
संबंधित बातम्या