रोहित शर्मानं कसोटीत टी-20 ची मानसिकता सोडावी, 'या' दिग्गजानं सांगितल्या हिटमॅनच्या कॅप्टन्सीतील चुका
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  रोहित शर्मानं कसोटीत टी-20 ची मानसिकता सोडावी, 'या' दिग्गजानं सांगितल्या हिटमॅनच्या कॅप्टन्सीतील चुका

रोहित शर्मानं कसोटीत टी-20 ची मानसिकता सोडावी, 'या' दिग्गजानं सांगितल्या हिटमॅनच्या कॅप्टन्सीतील चुका

Oct 27, 2024 05:22 PM IST

Sanjay Manjrekar on Rohit Sharma : भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी रोहित शर्माबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर मांजरेकरांनी रोहित शर्माचे कान टोचले आहेत.

रोहित शर्मानं कसोटीत टी-20 ची मानसिकता सोडावी, 'या' दिग्गजानं सांगितल्या हिटमॅनच्या कॅप्टन्सीतील चुका
रोहित शर्मानं कसोटीत टी-20 ची मानसिकता सोडावी, 'या' दिग्गजानं सांगितल्या हिटमॅनच्या कॅप्टन्सीतील चुका (AFP)

भारताने न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका गमावली आहे. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा ११३ धावांनी पराभव केला. न्यूझीलंडने मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. दुसरा कसोटी सामना पुण्यात खेळला गेला. या सामन्यावर माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मांजरेकर यांनी रोहित शर्माच्या कर्णधारपदावरही भाष्य केले आहे. मांजरेकर म्हणतात की, रोहितने कसोटीमध्ये टी-20 क्रिकेटचे धोरण लागू करू नये.

क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, संजय मांजरेकर म्हणाले, "सरफराज खानला फलंदाजीसाठी खाल्या क्रमांकावर पाठवणे आणि वॉशिंग्टन सुंदरला आधी पाठवणे, अशा गोष्टी चालत नाहीत. रोहित शर्माने एक गोष्ट टाळायला हवी. त्याने कसोटीत टी-20 मानसिकता सोडून द्यायला हवी. कसोटीत डाव्या आणि उजव्या हाताच्या संयोजनाची गरज नाही. त्यांनी फक्त त्यांच्या खेळाडूंच्या क्षमतेनुसार पुढे जावे.

दरम्यान, पुणे कसोटीच्या पहिल्या डावात न्यूझीलंडने २५९ धावा केल्या. दुसऱ्या डावात २५५ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ पहिल्या डावात १५६ धावांवर गडगडला. यादरम्यान यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल ३०-३० धावांवर बाद झाले. रवींद्र जडेजाने ३८ धावांचे योगदान दिले. टीम इंडिया दुसऱ्या डावात २४५ धावांवर गडगडली. यादरम्यान यशस्वी जैस्वालने ७७ धावांची खेळी केली. ६५ चेंडूंचा सामना करताना त्याने ९ चौकार आणि ३ षटकार मारले. जडेजाने ४२ धावा केल्या

न्यूझीलंडने कसोटी मालिकेतील पहिला सामना ८ गडी राखून जिंकला होता. दुसरा सामना ११३ धावांनी जिंकला. आता भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना १ नोव्हेंबरपासून खेळवला मुंबईत खेळला जाणार आहे.

Whats_app_banner