Asia Cup 2023 : केएल राहुल विकेटकीपिंग करणार नसेल तर संघातून वगळा, माजी कोचचा टीम इंडियाला सल्ला
KL Rahul asia cup 2023 : केएल राहुलने विकेटकिपिंग केली नाही तर त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नये, असे माजी कोच संजय बांगर यांनी म्हटले आहे.
Sanjay Bangar On KL Rahul : आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात केएल राहुल आणि श्रेयस अय्यरचे पुनरागमन झाले आहे, पण केएल राहुलची भूमिका काय असेल? तो स्पेशालिस्ट फलंदाज म्हणून खेळेल की विकेटकीपिंगही करेल? याबाबत अद्याप संभ्रम आहे.
ट्रेंडिंग न्यूज
पण या प्रश्नावर माजी भारतीय खेळाडू आणि कोच संजय बांगरने आपली प्रतिक्रिया दिली. संजय बांगर म्हणाले की, केएल राहुलने यष्टिरक्षक म्हणून खेळावे. जर त्याने विकेटकीपिंग केले नाही आणि तो फक्त फलंदाज म्हणून खेळला तर कदाचित टॉप-६ मध्ये असा एकही फलंदाज नसेल जो गरज पडल्यास गोलंदाजी करू शकेल.
संजय बांगर नेमकं काय म्हणाले?
संजय बांगर म्हणाले की, टॉप-5 मध्ये गोलंदाजी करू शकणारा खेळाडू असायला हवा. माझा विश्वास आहे की केएल राहुलचे संघात स्थान केवळ यष्टिरक्षक फलंदाज म्हणून आहे. त्याने विकेटकीपिंग केले नाही तर प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याला स्थान द्यावे, असे मला वाटत नाही.
सांघिक संयोजनात समतोल राखणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे केएल राहुल यष्टिरक्षक म्हणून अधिक फिट बसेल. पण त्याने यष्टिरक्षणाची जबाबदारी घेतली नाही तर अडचणी येतील.
इशान किशनला संधी मिळेल का?
संजय बांगर पुढे म्हणाले की, इशान किशनने फलंदाज म्हणून काहीही चुकीचे केलेले नाही, याशिवाय तो यष्टिरक्षकाची भूमिकाही उत्तमपणे पार पाडत आहे. त्यामुळे केएल राहुल संघात फक्त स्पेशालिस्ट फलंदाज म्हणून फिट बसेल असे मला वाटत नाही. ईशान किशनने फलंदाज आणि यष्टिरक्षक म्हणून आपली छाप सोडली आहे. यामुळे इशान किशनला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवणे सोपे जाणार नाही.