मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  शोएब मलिकच्या तिसऱ्या लग्नानंतर सानियाची पहिली पोस्ट, एका शब्दात सांगितली संपूर्ण स्टोरी

शोएब मलिकच्या तिसऱ्या लग्नानंतर सानियाची पहिली पोस्ट, एका शब्दात सांगितली संपूर्ण स्टोरी

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 26, 2024 11:56 AM IST

Sania Mirza Instagram Post : शोएब मलिकच्या तिसऱ्या लग्नानंतर सानियाने पहिली पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तिने शोएब मलिकसोबतच्या नात्याबद्दल स्पष्टपणे काहीही लिहिले नाही, पण एका शब्दात सानियाने संपूर्ण स्टोरी सांगितली आहे.

Sania Mirza Instagram Post After Divorce With Shoaib Malik
Sania Mirza Instagram Post After Divorce With Shoaib Malik

Sania Mirza Instagram Post Shoaib Malik : पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने अभिनेत्री सना जावेदसोबत तिसरे लग्न केले. या लग्नानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली. पण लग्नानंतर शोएब मलिकची दुसरी पत्नी सानिया मिर्झाने कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. पण आता तिने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. चाहते या फोटोला शोएब मलिकच्या तिसऱ्या लग्नाशी जोडून पाहत आहेत.

वास्तविक, शोएब मलिकच्या तिसऱ्या लग्नानंतर सानियाने पहिली पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तिने शोएब मलिकसोबतच्या नात्याबद्दल स्पष्टपणे काहीही लिहिले नाही, पण एका शब्दात सानियाने संपूर्ण स्टोरी सांगितली आहे.

फोटोमध्ये सानिया आरशासमोर उभी आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने केवळ एकच शब्द 'प्रतिबिंब' हा लिहिला आहे.

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शोएब मलिक याच्या तिसऱ्या लग्नानंतर काही दिवसांनी ही पोस्ट आली आहे. दरम्यान, शोएब आणि सनाच्या लग्नांतर मिर्झा कुटुंबियांनी सानिया आणि शोएबचा घटस्फोट फार पूर्वी झाल्याची माहिती दिली होती.

सानिया आणि शोएब मलिक यांना एक मुलगा

सानिया आणि शोएब मलिक यांचा विवाह एप्रिल २०१० मध्ये हैदराबादमध्ये झाला होता. त्यांना इझान नावाचा ५ वर्षांचा मुलगा असून तो सध्या सानिया मिर्झासोबत राहतो.

सना जावेद ही शोएब मलिकची तिसरी पत्नी

सना जावेद ही शोएब मलिकची तिसरी पत्नी आहे. सना जावेदच्या आधी शोएबने २०१० मध्ये भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाशी दुसरे लग्न केले होते. तेव्हा शोएबची पहिली पत्नी आयशा सिद्दीकी पुढे आली होती. सानियासोबतच्या लग्नाच्या वेळी शोएब मलिकने त्याची पहिली पत्नी आयशासोबत कोणत्याही प्रकारचे संबंध असल्याचे नाकारले होते, परंतु हे प्रकरण पुढे गेल्यावर शोएबने आयशाला घटस्फोट दिला.

शोएब मलिका क्रिकेट जगतातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. तो अनेक वर्षांपासून पाकिस्तानसाठी खेळत आहे. तसेच, अनेक क्रिकेट लीगमध्येही तो खेळताना दिसून येतो.

WhatsApp channel

विभाग

For latest Cricket News Live Score stay connected with HT Marathi