मोहम्मद शमी हा टीम इंडियाच्या महत्वाच्या क्रिकेटपटूंपैकी एक आहे तर सानिया मिर्झा ही भारतीय टेनिसमधील सर्वात यशस्वी खेळाडू आहे. दोन्ही खेळाडू आपापल्या खेळात तज्ञ आहेत आणि त्यांचा आदर केला जातो.
दरम्यान, या दोन्ही स्टार खेळाडूंचे वैयक्तिक आयुष्य सध्या चर्चेत आहे. शमीचे त्याची पत्नी हसीन जहाँसोबत अनेक दिवसांपासून वाद सुरू आहेत, तर सानिया मिर्झाने अलीकडेच पाकिस्तानी क्रिकेटर पती शोएब मलिकपासून घटस्फोट घेतला आहे.
शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत अचानक लग्न करून संपूर्ण जगाला चकित केले होते.
एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये आपल्या गोलंदाजीने धुमाकूळ घालणाऱ्या मोहम्मद शमीने अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले होते की, त्याने स्वतःबद्दल ऐकलेली सर्वात मोठी अफवा म्हणजे तो आणि सानिया मिर्झा लग्न करणार आहेत'.
या वर्षाच्या सुरुवातीला सानिया आणि पाकिस्तानचा क्रिकेट स्टार शोएब मलिक यांचा घटस्फोट झाला, तर शमीनेही पत्नी हसीन जहाँपासून विभक्त झाला आहे.
मात्र, शमी आणि सानियाच्या लग्नाच्या अफवांमध्ये काहीही तथ्य नाही. सानिया मिर्झाचे वडील इम्रान एका मुलाखतीत म्हणाले की, हे सर्व बकवास आहे. ती त्याला कधी भेटलीही नाही'.
भारताची टेनिस आयकॉन सानिया मिर्झाने हजच्या पवित्र प्रवासाला सुरुवात केली आहे. ५ महिन्यांपूर्वी तिने तिचा क्रिकेटर पती शोएब मलिकपासून वेगळे झाल्याची घोषणा केली होती. सानियाने व्यावसायिक टेनिसमधूनही निवृत्ती घेतली आहे.
सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये सानियाने नुकतेच लिहिले होते,की “माझ्या प्रिय मित्रांनो, मला हजच्या पवित्र यात्रेला जाण्याचे सौभाग्य मिळाले. मी माझ्या आयुष्यात बदलाच्या प्रवासाला सुरुवात करत आहे आणि माझ्या सर्व चुकांसाठी तुम्हा सर्वांची माफी मागते. मला आशा आहे की अल्लाह माझी प्रार्थना ऐकेल आणि मला मार्गदर्शन करेल.”
संबंधित बातम्या