Fact Check: मोहम्मद शमी आणि सानिया मिर्झाच्या फोटोने सोशल मीडियावर खळबळ, सत्य समजल्यानंतर सगळेच शॉक!
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Fact Check: मोहम्मद शमी आणि सानिया मिर्झाच्या फोटोने सोशल मीडियावर खळबळ, सत्य समजल्यानंतर सगळेच शॉक!

Fact Check: मोहम्मद शमी आणि सानिया मिर्झाच्या फोटोने सोशल मीडियावर खळबळ, सत्य समजल्यानंतर सगळेच शॉक!

Dec 24, 2024 12:52 PM IST

Mohammad Shami and Sania Mirza Viral Photo: मोहम्मद शमी आणि सानिया मिर्झा यांचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

 मोहम्मद शमी आणि सानिया मिर्झाच्या फोटोने सोशल मीडियावर खळबळ
मोहम्मद शमी आणि सानिया मिर्झाच्या फोटोने सोशल मीडियावर खळबळ

Viral News: भारताचा स्टार क्रिकेटपटू मोहम्मद शमी आणि भारतीय माजी टेनिसपटू सानिया मिर्झा यांच्या एका फोटोने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये दोन्ही खेळाडू दुबईमध्ये वेळ घालवत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या दोघांचा फोटो सोशल मीडियावर येताच लोकांनी सर्व प्रकारचे अंदाज बांधण्यास सुरुवात केली आहे. काही महिन्यांपूर्वीच सानियाने पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकपासून घटस्फोटही घेतला. तर, मोहम्मद शमी त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत होता.

मोहम्मद शमी आणि टेनिस स्टार सानिया मिर्झा यांच्याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर अफवा सुरू आहेत. अशातच त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये दोघेही ख्रिसमसच्या गेटअपमध्ये दिसत आहेत. व्हायरल होत असलेल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये दोघेही दुबईमध्ये सुट्टी एन्जॉय करत असल्याचे लिहिण्यात आले. या फोटोवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया द्यायला सुरूवात केली आहे. मात्र, या फोटोमागचे सत्य जाणून अनेकांना धक्का बसला आहे.

शमी आणि सानियाचा व्हायरल होत असलेला फोटो पूर्णपणे बनावट असल्याचे समजत आहे.हा फोटो आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून तयार करण्यात आले. शमी आणि सानियाचा फोटो २३ डिसेंबरला फेसबूकवर पोस्ट करण्यात आला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात लोकांनी हा फोटो इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करायला सुरुवात केली. पण याबाबत अधिक तपासणी केली असता हा फोटो एआयचा वापर करून बनवण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

 

मोहम्मद शमी आणि टेनिस स्टार यांच्यात गेल्या अनेक महिन्यांपासून अफवा सुरू झाल्या. यावर्षी जुलै महिन्यात त्यांच्या लग्नाबाबत चुकीची माहिती पसरवली जात होती. पण शमीने पॉडकास्टवर याचे खंडन केले आणि सांगितले की हे पूर्णपणे खोटे आणि विचित्र आहे.मीम्स चांगले आहेत, पण कोणाच्याही आयुष्याबाबत अशा बातम्या प्रसिद्ध करू नयेत, असे शमी म्हणाला होता.

शमी दुखापतीमुळे तो गेल्या एक वर्षापासून टीम इंडियातून बाहेर आहे. अलीकडेच त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे, जिथे त्याने चमकदार कामगिरी केली. त्यानंतर टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याच्या समावेशाबाबत चर्चा सुरू झाली. पण काल ​​२३ डिसेंबर रोजी बीसीसीआयने स्पष्ट केले की, वेगवान गोलंदाजाला अजून विश्रांतीची गरज आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघात त्याचा समावेश केला जाऊ शकत नाही.

माजी पाकिस्तानी फलंदाज आणि क्रिकेटर शोएब मलिकपासून घटस्फोट घेतल्यानंतर सानिया मिर्झा हैदराबादमध्ये आपले आयुष्य जगत आहे. अलीकडेच तिने भारतातील विविध शहरांमध्ये विविध कार्यक्रमांमध्ये भाग घेतला आहे. यूएईमधील वर्ल्ड टेनिस लीगमध्येही ती व्यस्त आहे. अशा परिस्थितीत या दोन दिग्गजांबद्दल पसरवल्या जात असलेल्या अफवा पूर्णपणे निराधार आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या