Samsung Galaxy M55: स्टायलिश लूक आणि आगळावेगळा रंग; सॅमसंग गॅलेक्सी एम ५५ मधील फीचर्स लीक!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Samsung Galaxy M55: स्टायलिश लूक आणि आगळावेगळा रंग; सॅमसंग गॅलेक्सी एम ५५ मधील फीचर्स लीक!

Samsung Galaxy M55: स्टायलिश लूक आणि आगळावेगळा रंग; सॅमसंग गॅलेक्सी एम ५५ मधील फीचर्स लीक!

Updated Mar 24, 2024 07:35 AM IST

Samsung Galaxy M55 Features Leak: आगामी स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी एम ५५ मधील फीचर्स लीक झाले आहेत.

सॅमसंग गॅलेक्सी एम ५५ स्मार्टफोनमधील संभाव्य फीचर्सबाबत जाणून घेऊयात.
सॅमसंग गॅलेक्सी एम ५५ स्मार्टफोनमधील संभाव्य फीचर्सबाबत जाणून घेऊयात. (HT Tech)

Samsung Galaxy M Series: सॅमसंग कंपनीच्या गॅलेक्सी एम सीरिजमधील आगामी स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी एम ५५ चे फीचर्स लीक झाले आहेत. या स्मार्टफोनमध्ये ग्राहकांना स्टायलिश लूक आणि आगळावेगळा रंग मिळणार आहे. नुकताच सॅमसंग गॅलेक्सी एम १५ 5G निवडक बाजारात लॉन्च झाला आहे. लवकरत हा स्मार्टफोन भारतातही लॉन्च होऊ शकतो. दरम्यान, सॅमसंग गॅलेक्सी एम ५५ च्या लीक फीचर्सबाबत जाणून घेऊयात.

प्रसिद्ध टिप्सटर मुकुल शर्मा @stufflistings यांच्या मते, सॅमसंग गॅलेक्सी एम ५५ मध्ये १२ जीबीपर्यंत रॅम मिळण्याची शक्यता आहे. हा स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी एम-सीरिज सर्वात पातळ फोन असेल. या फोनमध्ये ६.७ इंच एचडी प्लस डिस्प्ले मिळत आहे. हा फोन हलक्या हिरव्या आणि काळ्या रंगात व्हेरिएंटमध्ये बाजाराज दाखल होण्याची शक्यता आहे.

या फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअट मिळण्याची शक्यता आहे, ज्यात मुख्य कॅमेरा ५० मेगापिक्सल, ८९ एमपी अल्ट्रावाइड लेन्स आणि २ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळू शकतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे. फ्रंट कॅमेऱ्यामध्ये ग्राहकांना सेल्फ पोर्ट्रेट फीचर्स दिला जाऊ शकतो.

Motorola Edge 50 Pro: मोटोरोला एज ५० प्रोमध्ये मिळणार अ‍ॅडव्हान्स एआय फीचर्स , 'या' दिवशी होतोय लॉन्च!

सॅमसंग गॅलेक्सी एम ५५ मध्ये ग्राहकांना ५ हजार एमएएच क्षमता असलेली बॅटरी दिली जाऊ शकते. हा फोन १२८ जीबी आणि २५६ जीबी स्टोरेज अशा दोन पर्यायसह बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे, जो मायक्रोएसडी कार्डद्वारे १ टीबीपर्यंत वाढवता येऊ शकतो. अतिरिक्त सुरक्षेसाठी डिव्हाइसमध्ये अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील देण्यात आला आहे.

Whats_app_banner