फ्लिपकार्ट, ॲमेझॉननंतर सॅमसंगचा सेल! ‘फॅब ग्रॅब फेस्‍ट’ मध्ये टीव्ही, टॅब्लेट्सवर मिळतेय बंपर सूट!-samsung fab grab fest is live bumper discount on smart tv mobile tablets and other electronics in samsung fab grab fest ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  फ्लिपकार्ट, ॲमेझॉननंतर सॅमसंगचा सेल! ‘फॅब ग्रॅब फेस्‍ट’ मध्ये टीव्ही, टॅब्लेट्सवर मिळतेय बंपर सूट!

फ्लिपकार्ट, ॲमेझॉननंतर सॅमसंगचा सेल! ‘फॅब ग्रॅब फेस्‍ट’ मध्ये टीव्ही, टॅब्लेट्सवर मिळतेय बंपर सूट!

Sep 27, 2024 05:15 PM IST

samsung fab grab fest : सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडचा सर्वात मोठा फेस्टिव्‍ह सेल ‘फॅब ग्रॅब फेस्‍ट’ सुरू झाला आहे.

फ्लिपकार्ट, ॲमेझॉननंतर आता सॅमसंगचा सेल! ‘फॅब ग्रॅब फेस्‍ट’ मध्ये टीव्ही, टॅब्लेट्सवर बंपर सूट!
फ्लिपकार्ट, ॲमेझॉननंतर आता सॅमसंगचा सेल! ‘फॅब ग्रॅब फेस्‍ट’ मध्ये टीव्ही, टॅब्लेट्सवर बंपर सूट! (REUTERS)

सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडचा सर्वात मोठा फेस्टिव्‍ह सेल 'फॅब ग्रॅब फेस्‍ट' सुरू झाला आहे. हा सेल गुरुवारपासून (२६ सप्‍टेंबर) ग्राहकांसाठी सुरू झाला. या फेस्टिव्‍ह सेलदरम्‍यान गॅलॅक्‍सी स्‍मार्टफोन्‍स, टॅब्‍लेट्स, लॅपटॉप्‍स, अ‍ॅक्‍सेसरीज, वेअरेबल्‍स, स्‍मार्ट टेलिव्हिजन्‍स, डिजिटल अप्‍लायन्‍सेस आणि स्‍मार्ट मॉनिटर्सवर आकर्षक डिल्‍स व कॅशबॅक ऑफर करण्‍यात आली आहे. 

या अभूतपूर्व ऑफर्स Samsung.com, सॅमसंग शॉप अ‍ॅप आणि सॅमसंग एक्‍सक्‍लुसिव्‍ह स्‍टोअर्समध्‍ये उपलब्‍ध असतील.

कंपनीने सांगितल्यानुसार, बाय मोअर सेव्‍ह मोअर अशी या फेस्टिव्‍ह सेलची खासियत असणार आहे. ग्राहक दोन किंवा अधिक उत्‍पादनांच्‍या खरेदीवर अतिरिक्‍त जवळपास ५ टक्‍के सूटचा आनंद घेऊ शकतात. ही ऑफर Samsung.com किंवा सॅमसंग शॉप अ‍ॅपच्‍या माध्‍यमातून खरेदी करताना फक्‍त निवडक स्‍मार्टफोन्‍स, वेअरेबल्‍स, स्‍मार्ट टेलिव्हिजन्‍स आणि डिजिटल अप्‍लायन्‍सेसवर लागू आहे.

बाय मोअर सेव्‍ह मोअरचा भाग म्‍हणून, गॅलॅक्‍सी झेड फोल्‍ड ६ खरेदी करणाऱ्या ग्राहकांना इतर सर्व लागू ऑफर्ससोबत गॅलॅक्‍सी बड्स एफई फक्‍त १२४९ रूपयांमध्‍ये मिळू शकतो. 

तसेच, गॅलॅक्‍सी बुक ४ खरेदी करणाऱ्या ग्राहकांना एफएचडी फ्लॅट मॉनिटर फक्‍त १९२० रूपयांमध्‍ये मिळू शकतो. विना अतिरिक्‍त खर्चामध्‍ये इतर अनेक उत्‍पादने देखील उपलब्‍ध आहेत.

सॅमसंगची अधिक मूल्‍य वितरित करण्‍याप्रती कटिबद्धता ही या फॅब ग्रॅब फेस्‍टला वरचढ ठरवते. किमतीमध्‍ये सूट, बँक कॅशबॅक ऑफर्स आणि एक्‍स्‍चेंज डिल्‍स व्‍यतिरिक्‍त 'बाय मोअर, सेव्‍ह मोअर' खात्री देते की, Samsung.com ग्राहकांना स्‍मार्टफोन्‍स, अ‍ॅक्‍सेसरीज, स्‍मार्ट टेलिव्हिजन्‍स किंवा डिजिटल अप्‍लायन्‍सेस अशा प्रत्‍येक खरेदीसाठी अधिक फायदा मिळतो.

'फॅब ग्रॅब फेस्‍ट'दरम्‍यान ग्राहकांना गॅलॅक्‍सी झेड सिरीज, गॅलॅक्‍सी एस सिरीज आणि गॅलॅक्‍सी ए सिरीज स्‍मार्टफोन्‍सच्‍या निवडक मॉडेल्‍सवर जवळपास ५३ टक्‍के सूट मिळू शकते. गॅलॅक्सी बुक ४ सिरीज लॅपटॉप्‍सचे निवडक मॉडेल्स जवळपास २७ टक्‍के सूटसह उपलब्‍ध असतील, तर टॅब ए९ व टॅब एस९ सिरीज, बड्स३ सिरीज, गॅलॅक्‍सी वॉच सिरीजच्‍या विशिष्‍ट मॉडेल्‍सवर जवळपास ७४ टक्‍के सूट मिळेल.

यानंतर ग्राहकांना साइड बाय साइड आणि फ्रेंच डोअर रेफ्रिजरेटर्स यांसारख्‍या प्रीमियम अप्‍लायन्‍सेसच्‍या व्‍यापक श्रेणीवर जवळपास ३९ टक्‍के सूट मिळू शकते. ग्राहकांना डिजिटल इन्‍व्‍हर्टर कॉम्‍प्रेसर्सवर २० वर्षांची वॉरंटी देखील मिळेल. ८ किग्रॅ व त्‍यापेक्षा अधिक क्षमता असलेल्‍या फ्रण्‍ट लोड व टॉप लोड वॉशिंग मशिन्‍सवर जवळपास २८ टक्‍के सूट आणि डिजिटल इन्‍व्‍हर्टर मोटरवर २० वर्षांची वॉरंटी मिळेल. निवडक ९ किग्रॅ फुली ऑटोमॅटिक फ्रण्‍ट-लोडिंग वॉशिंग मशिन्‍सवर जवळपास २,००० रूपयांची त्‍वरित कार्ट सूट देखील मिळेल.

ICICI, HDFC, SBI आणि इतर आघाडीच्‍या बँकांवर कॅशबॅक

ग्राहक फॅब ग्रॅब फेस्‍टदरम्‍यान आयसीआयसीआय, एचडीएफसी आणि इतर आघाडीच्‍या बँकांच्‍या डेबिट व क्रेडिट कार्ड्सचा वापर करत निवडक स्‍मार्टफोन्‍स, टॅब्‍लेट्स, वीअरेबल्‍स व लॅपटॉप्‍सवर जवळपास ४० टक्‍के कॅशबॅक (जवळपास १५,००० रूपये)चा आनंद घेऊ शकतात.

तसेच, फॅब ग्रॅब फेस्‍ट ऑफर्सचा भाग म्‍हणून निवडक स्‍मार्ट टेलिव्हिजन्‍स व डिजिटल अप्‍लायन्‍सेसच्‍या खरेदीसाठी ग्राहक आयसीआयसीआय, एचडीएफसी एसबीआय आणि इतर आघाडीच्‍या बँकांच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्ड्सचा वापर करत जवळपास २२.५ टक्‍के कॅशबॅक (जवळपास २५,००० रूपये)चा लाभ घेऊ शकतात.

Whats_app_banner