Sameer Rizvi Double Hundred : २० षटकार आणि १३ चौकार, समीर रिझवीनं ९७ चेंडूत ठोकलं द्विशतक
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Sameer Rizvi Double Hundred : २० षटकार आणि १३ चौकार, समीर रिझवीनं ९७ चेंडूत ठोकलं द्विशतक

Sameer Rizvi Double Hundred : २० षटकार आणि १३ चौकार, समीर रिझवीनं ९७ चेंडूत ठोकलं द्विशतक

Dec 22, 2024 11:30 AM IST

Sameer Rizvi Double Hundred : समीर रिझवीने ९७ चेंडूत द्विशतक झळकावून धुमाकूळ घातला आहे. हे द्विशतक पूर्ण करण्यासाठी समीरने २० षटकार आणि १३ चौकार लगावले.

Sameer Rizvi Double Hundred : २० षटकार आणि १३ चौकार... समीर रिझवीनं ९७ चेंडूत ठोकलं द्विशतक
Sameer Rizvi Double Hundred : २० षटकार आणि १३ चौकार... समीर रिझवीनं ९७ चेंडूत ठोकलं द्विशतक (PTI)

Sameer Rizvi Double Hundred, 20 Sixes And 13 Fours : आयपीएल २०२५ पूर्वी समीर रिझवी याने झंझावाती द्विशतक झळकावले आहे. समीर रिझवीने अंडर २३ राज्य अ ट्रॉफीमध्ये त्रिपुराविरुद्ध हे द्विशतक ठोकले. रिझवीने आयपीएल २०२४ मध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते.

या स्पर्धेत उत्तर प्रदेशचे कर्णधार असलेल्या समीर रिझवीने ९७ चेंडूत २० षटकार आणि १३ चौकारांच्या मदतीने २०१* धावा केल्या. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने हा पराक्रम केला.

समीरची ही कामगिरी दिल्ली कॅपिटल्ससाठी मोठा दिलासा आहे. दिल्लीने समीरला आयपीएल २०२५ साठी ९५ लाख रुपयांना विकत घेतले. याआधी, मागील हंगामात म्हणजेच २०२४ च्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जने समीरला ८.४ कोटी रुपयांना विकत घेतले होते.

सर्वात वेगवान द्विशतकाचा विक्रम केला

समीर रिझवीचे द्विशतक हे २३ वर्षांखालील राज्य अ ट्रॉफीमधील सर्वात वेगवान द्विशतक ठरले. समीरने ९७ चेंडूत द्विशतक पूर्ण केले.

उत्तर प्रदेशने ४०५ धावा ठोकल्या

समीर रिझवीच्या स्फोटक शतकामुळे संघाने मोठी धावसंख्या फलकावर लावली. त्रिपुराविरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना उत्तर प्रदेशने ५० षटकांत ४०५/४ धावा केल्या. कर्णधार समीर रिझवीशिवाय आदर्श सिंग आणि शौर्य सिंग यांनी संघासाठी शानदार अर्धशतके झळकावली. आदर्शने ६४ चेंडूत ३ चौकारांच्या मदतीने ५२ धावा केल्या, तर शौर्याने ३८ चेंडूत ९ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ५१ धावा केल्या.

त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना त्रिपुरा संघाला ५० षटकात ९ बाद २५३ धावाच करता आल्या. आनंद भौमिकने संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली आणि ७८ चेंडूत ७ चौकारांच्या मदतीने ६८ धावा केल्या. मात्र, त्याची खेळी संघाला विजयापर्यंत नेऊ शकली नाही.

उत्तर प्रदेशने हा सामना १५२ धावांनी जिंकला. उत्तर प्रदेशकडून कुणाल त्यागीने सर्वाधिक ३ बळी घेतले. याशिवाय वंश चौधरी आणि विजय कुमार यांना २-२ तर शुभमन मिश्रा आणि प्रशांत वीर यांना १-१ विकेट मिळाला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या