मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात खेळल्या जात असलेल्या बॉक्सिंग-डे कसोटी सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी, दोन्ही संघांच्या प्लेइंग ११ मध्ये मोठा बदल करण्यात आला.
टीम इंडियाकडून शुभमन गिलच्या जागी वॉशिंग्टन सुंदरचा समावेश करण्यात आला आहे, तर ऑस्ट्रेलियाने सॅम कॉन्स्टास आणि जोश हेझलवूड यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा दिली आहे. या सामन्यातून ऑस्ट्रेलियन खेळाडू सॅम कॉन्स्टास याने एक खास विक्रम आपल्या नावे केला आहे.
भारताविरुद्ध सुरू असलेल्या या कसोटी मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांमध्ये उस्मान ख्वाजासोबत डावाची सुरुवात करणाऱ्या नॅथन मॅकस्विनी याला ऑस्ट्रेलियन संघाने त्याच्या खराब कामगिरीमुळे उर्वरित २ सामन्यांसाठी संघात स्थान दिले नाही. त्याच्या जागी १९ वर्षीय सॅम कोन्स्टासचा संघात समावेश करण्यात आला आहे.
मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर जेव्हा सॅमला त्याच्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात बॅगी ग्रीन कॅप देण्यात आली, तेव्हा तो ऑस्ट्रेलियासाठी या फॉरमॅटमध्ये पदार्पण करणारा चौथा सर्वात युवा खेळाडू ठरला.
सॅमने वयाच्या १९ वर्षे ८५ दिवसांत कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या बाबतीत सॅमने क्लेम हिलचा विक्रम मोडला आहे, ज्याने १८९६ साली वयाच्या १९ वर्षे ९६ दिवसांत कसोटी पदार्पण केले होते.
इयान क्रेग - १७ वर्षे २३९ दिवस (वर्ष १९५३ )
पॅट कमिन्स - १८ वर्षे १९३ दिवस (२०११)
टॉम गॅरेट - १८ वर्षे २३२ दिवस (वर्ष १८७७)
सॅम कॉन्स्टास - १९ वर्षे ८५ दिवस (वर्ष २०२४)
क्लेम हिल - १९ वर्षे ९६ दिवस (वर्ष १८९६)
संबंधित बातम्या