मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  AUS vs PAK : सैम अयुब कोण आहे? पाकिस्तान क्रिकेटमध्ये त्याची एवढी चर्चा का? ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण करणार

AUS vs PAK : सैम अयुब कोण आहे? पाकिस्तान क्रिकेटमध्ये त्याची एवढी चर्चा का? ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण करणार

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Dec 31, 2023 07:09 PM IST

Who is Saim Ayub, aus vs pak test : सॅम अयुबचा देशांतर्गत सामन्यांमधील रेकॉर्ड चांगला आहे. त्याने पाकिस्तानकडून टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. मात्र आतापर्यंत त्याला वनडे आणि कसोटीत संधी मिळालेली नाही.

Saim Ayub
Saim Ayub

Australia vs Pakistan 3rd Test : पाकिस्तानी टीम सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावरील दोन कसोटी सामने पाकिस्तानने गमावले आहे. आता मालिकेतील तिसरा कसोटी सामना सिडनीत होणार आहे. या सामन्यासाठी पाकिस्तान टीम मॅनेजमेंट सैम अयुबला पदार्पणाची संधी देऊ शकते. 

सॅम अयुबचा देशांतर्गत सामन्यांमधील रेकॉर्ड चांगला आहे. त्याने पाकिस्तानकडून टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. मात्र आतापर्यंत त्याला वनडे आणि कसोटीत संधी मिळालेली नाही. पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू इमाम उल हकला संघातून डच्चू मिळू शकतो. गेल्या २ सामन्यांत त्याची कामगिरी खराब झाली आहे.

पाकिस्तानचा सलामीवीर इमाम उल हकने गेल्या २ सामन्यांच्या ४ डावात ९४ धावा केल्या आहेत. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात तो केवळ १० धावा करून बाद झाला. यानंतर दुसऱ्या डावातही केवळ १२ धावा करता आल्या. 

सैम अयुबची देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी

खराब कामगिरीमुळे इमामला टीकेला सामोरे जावे लागत आहे. इमामला तिसऱ्या कसोटीतून वगळले जाऊ शकते. त्याच्या जागी सॅम अयुबला पदार्पणाची संधी मिळू शकते.

सैम अयुबने देशांतर्गत सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याने प्रथम श्रेणी सामन्यांच्या २६ डावांमध्ये १०६९ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने ३ शतके आणि ३ अर्धशतके केली आहेत. 

अयुबने लिस्ट ए च्या ३० डावात १२४७ धावा केल्या आहेत. यात त्याने ३ शतके आणि ७ अर्धशतके केली आहेत. त्याने पाकिस्तानसाठी ८ टी-20 सामनेही खेळले आहेत. 

दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानला ३६० धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. यानंतर दुसऱ्या सामन्यात त्यांना ७९ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. आता तिसरा सामना ३ जानेवारीपासून सिडनीत खेळवला जाणार आहे. 

WhatsApp channel